Manjiri Oak SAAM TV
मनोरंजन बातम्या

Manjiri Oak : 'पैसे देऊनही जीव मुठीत...' मंजिरी ओक रिक्षा चालकावर भडकली; कारण काय?

Manjiri Oak Angry On Auto Driver : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको मंजिरी ओकने सोशल मीडियावर रिक्षा चालक संदर्भात एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेता प्रसाद ओक कायम चुकीच्या गोष्टींवर आपली परखड मते मांडताना दिसत असतो. तसेच त्यांची बायको मंजिरी ओक (Manjiri Oak) देखील स्पष्ट वक्ता आहे. सध्या मंजिरी ओकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मंजिरी ओक रिक्षा चालकाच्या एका कृतीचा निषेध करताना पाहायला मिळत आहे.

मुंबईसारख्या धावपळीच्या जगात गर्दी आणि वाहतूक कोंडी वाढतच जात आहे. अनेक सेलिब्रिटी आपला वेळ वाचवण्यासाठी किंवा कधीतरी गरजेसाठी रिक्षाने प्रवास करतात. मंजिरी ओकनेही नुकताच रिक्षातून प्रवास केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. मंजिरी ओकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रिक्षा चालक फोनवर बोलत रिक्षा चालवताना दिसत आहे. याबाबत मंजिरीने आपले मत परखडपणे सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.

मंजिरी ओकने रिक्षा चालकाचा व्हिडीओ पोस्ट करून एक संतापजनक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांकडून तसेच कलाकारांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मंजिरी ओक ज्या रिक्षामध्ये बसली आहे. तो रिक्षावाल रील्स पाहताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मंजिरी ओकने सांगूनही रिक्षा चालक त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि रिल्स पाहण्यात मग्न आहे.

manjiri oak

मंजिरी ओकची पोस्ट

पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन, असा प्रवास का करायचा? आणि ह्यावर ह्यांना काही बोलायच नाही, कारण ह्यांचीच अरेरावी ऐकून घ्यायला लागेल . दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडे गेलं तरी चालेल समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच...त्यांनी मला तो पूर्ण वेळ असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानाने सांगितले... एकूणच कठीण आहे सगळं...देव त्याला अक्कल देवो...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hairstyle Ideas: स्वानंदीच्या या ९ हेअरस्टाईल तुम्ही करा ट्राय; प्रत्येक लूकवर दिसतील एकदम परफेक्ट

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT