Prasad Oak SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prasad Oak : प्रसाद ओकला मुलाने गिफ्ट केली आलिशान कार, VIDEO पोस्ट करत म्हणाला - 'मुलगा असूनही बाप झालास'

Prasad Oak New Car : मराठी अभिनेता प्रसाद ओकला त्याच्या मुलाने आलिशान कार गिफ्ट केली आहे. याची पोस्ट प्रसाद आणि पत्नी मंजिरी यांनी शेअर केली आहे.

Shreya Maskar

अनेक वेळा आपण बापाने मुलांना महागड्या गिफ्ट दिलेल्या गोष्टी ऐकतो. मात्र आता अभिनेता प्रसाद ओकच्या (Prasad Oak) मुलांनी त्याला आलिशान कार गिफ्ट केली आहे. ही बातमी प्रसाद आणि मंजिरीने सोशल मिडियावर पोस्ट करत दिली आहे. प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर आणि स्वतःची गाडी हवी असते. पण जर असे गिफ्ट मुलाकडून मिळाले तर वडिलांसाठी ही खूप भावनिक आणि अभिमानाची गोष्ट आहे.

अभिनेता प्रसाद ओकच्या मुलांनी स्वतःच्या वाढदिवसादिवशी आपल्या वडिलांना हे कमाल गिफ्ट दिले आहे. लाडक्या लेकाची आपल्या लाडक्या बापाला दिलेली सुरेख भेट पाहून मंजिरी (Manjiri Oak) देखील भावूक झाली आहे. तिने सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या मुलाचं कौतुक केलं आहे. तसेच मुलाचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

प्रसाद आणि मंजिरीला मयंक (Mayank Oak) आणि सार्थक अशी दोन मुलं आहेत. प्रसादला मयंकने गिफ्टमध्ये BMW कार दिली आहे. तसेच अभिनेता प्रसाद ओकने देखील आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसादने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मुलगा असूनही बाप झालास.' तसेच शुभेच्छा देऊन लेकाचे आभार मानले आहे. दोघांच्याही पोस्टवर कलाकारांकडून आणि चाहत्यांकडून प्रेमाचा- कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रसाद ओक लवकरच ‘धर्मवीर २’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : भाजपला जबरी धक्का, डोंबिवलीतील ४ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

अजब अटींमुळे नाफेडची कांदा खरेदी रखडणार? राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात

Thursday Horoscope : व्यवसायात भरभराट होईल, संकटातून बाहेर पडाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न होणार

मान्सूनपूर्व पावसातच मुंबईची दैना; काँक्रिटची मुंबई पावसात बुडणार? video

SCROLL FOR NEXT