Prajaktta Mali Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Video: प्राजक्ता माळीचा 'मनसे' ध्यास; नवीन गाण्यावरच्या डान्स व्हिडिओने घातलाय धुमाकूळ

Prajakta Mali Dance: प्राजक्ता मनसेच्या नवीन गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Pooja Dange

Prajakta Mali Dance On MNS Theme Song: अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरील तिच्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ता अभिनयासह अनेक विविध गोष्टी देखील करत असते. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. प्राजक्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चला पाहूया प्राजक्ताच्या या नवीन व्हिडिओमध्ये काय खास आहे ते.

प्राजक्ताच्या व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये मनसेच्या नवीन गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. प्राजक्ताचे या गाण्यावर नाचतानाचे भाव लक्ष वेधून घेणारे आहेत. प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे नाजूक असलेली प्राजक्ता या गाण्यावर नाचताना एखाद्या मनसे कार्यकर्त्यासारखी बिनधास्त आणि बेधडक दिसत आहे.

प्राजक्ताचा हा व्हिडिओ मनसेच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या पेजच्या हा व्हिडिओ प्राजक्ताला टॅग देखील केला आहे.

प्राजक्ताचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एक डान्स स्टुडिओमधील आहे. कदाचित मनसेच्या आगामी कार्यक्रमात प्राजक्ता या गाण्यावर थिरकू शकते किंवा या गाण्यावर प्राजक्ताचा व्हिडिओ देखील येऊ शकतो.

राज ठाकरे कलाकार प्रेमी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. प्राजक्ताच्या 'प्राजक्तराज' या दागिन्यांच्या उद्दघाटन सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. दरम्यान प्राजक्ताच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कलाकारांचे मनसे प्रेम दिसून येत आहे.

मनसे हे गाणे अवधूत गुप्ते आणि अपूर्व निषाद यांनी गायले आहे. तर हितेश मोदक यांनी हे गाणे संगीबद्ध केले आहे. मंदार चोळकर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनसेच्या वर्धापनदिनी म्हणजे ९ मार्चला हे गाणे प्रदर्शित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT