Prajakta Mali Instagram
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला नाशिकमध्ये विरोध, नेमकं प्रकरण काय?

Prajakta Mali Mahashivratri Program : प्राजक्ता माळीच्या नाशिकमधील महाशिवरात्रीला होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. या मागचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. महाशिवरात्रीला नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी एक कार्यक्रम करणार होती. मात्र त्याला आता विरोध करण्यात आला आहे. माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी हा विरोध केला आहे. तसेच त्यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र पाठवलं आहे. सेलिब्रिटींच्या कार्यक्रमांची मंदिरात परंपरा नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

बुधवारी रात्री ८ वाजता पुण्याच्या नटरंग अकॅडमीतर्फे शिवार्पणमस्तु हा नृत्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यात शिवार्पणमस्तु नृत्य सादर करणार आहे. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचा मंदिरातील प्राजक्ता माळीच्या नृत्यास विरोध केला आहे. प्राजक्ता माळीचे नृत्य हे मंदिराच्या परंपरेच्या विरोधात असल्याचे तसेच चेंगराचेंगरी होण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करून ललिता शिंदे यांनी पुरातत्त्व विभागाकडे तक्रार केली आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ताचा 'शिवार्पणमस्तु'चा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. मात्र यामुळे मंदिराचे धार्मिक वातावरण बिघडू शकते, म्हणून ललिता शिंदे यांनी प्राजक्ताच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. महाशिवरात्रीला शिव मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते. हेच गर्दी आणि उत्साहाचे वातावरण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला असते. मात्र अद्याप प्राजक्ता माळीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. तसेच पुरातत्व विभागाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्राजक्ता माळी अभिनयासोबतच नृत्यासाठी देखील ओळखली जाते. तिच्या नृत्याचे चाहते दिवाने आहेत. प्राजक्ता माळी एक उत्तम कवयित्री तसेच यशस्वी व्यावसायिका देखील आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी नेहमी देवदर्शन करताना दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT