Prajakta Mali Chilling At Farm House After Movie Release Saam TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Post: प्राजक्ता माळी झाडाखाली निवांत झोपून सेट करतेय नवीन 'रीत'; फार्म हाऊसचे फोटो शेअर करत म्हणाली...

Prajakta Mali Farm House: प्राजक्ता माळीने नुकतेच तिच्या या फार्म हाऊसवरील नवीन आठवणी शेअर केल्या आहेत.

Pooja Dange

Prajakta Mali Movie:

अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी तिच्या पोस्ट आणि कामाने नेहमीच चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून सुत्रसंचालक म्हणुन प्राजक्ता आपल्या भेटीला येत असते.

प्राजक्ता माळीने काही महिन्यांपुर्वी कर्जत येथे फार्म हाऊस खरेदी केले आहे. प्राजक्ताने तिच्या फॅमिलीसोबत आणि MHJ च्या टीमसोबत या फार्म हाऊसवर धमाल करतान फोटो, व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने नुकतेच तिच्या या फार्म हाऊसवरील नवीन आठवणी शेअर केल्या आहेत. प्राजक्ता तिच्या या घरी निवांत वेळ घालवत आहे. या फोटोंमध्ये प्राजक्ता तिच्या फार्म हाऊससमोरील झाडाखाली निवांत झोपली आहे, फोनवर बोलत आहे, चहा किंवा कॉफीचा आनंद घेताना दिसत आहे.

तिचे हे फोटो पोस्ट करत लिहिले आहे, 'याज साठी केला होता अट्टाहास… प्रत्येक चित्रपट प्रदर्शित आणि शूट झाल्यानंतर: 'कुंज' येथे आराम करणे रीत होणार आहे. कारण निसर्ग तुम्हाला बरं करतो. तुम्हाला आनंद आणि समाधान देतो.' प्राजक्ता माळीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. नेटकरी कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत.

प्राजक्ता माळीचा 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये प्राजक्तासह वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी हे कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT