Prajakta Mali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Phullwanti Dance: प्राजक्ता माळी शिकवतेय स्टेप बाय स्टेप डान्स; Video पाहिलात का?

Prajakta Mali Dance: 'फुलवंती' चित्रपटातील गाण्यामध्ये प्राजक्ताने तिच्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने भुरळ घातली आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्राजक्ता माळी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ताने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अनोख स्थान केलं आहे. प्राजक्ताला नृत्याची विशेष आवड आहे. अभिनेत्री, निवेदिका आणि बिझनेसवूमन अशा सर्व क्षेत्रात प्राजक्ता यशस्वी ठरली आहे.

अभिनेत्रीने प्राजक्ताचा नवीन 'फुलवंती' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटातून प्राजक्ताने तिचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. प्राजक्ता माळी फुलवंती या चित्रपटाची निर्माती आहे. प्राजक्ताचा फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नुकतंच प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हॅडलवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्राजक्ता माळी फुलवंती गाण्यातील डान्स स्टेप्स करत आहे. पोस्ट शेअर करत प्राजक्ताने, "फुलवंती बाईसाहेब “फुलवंती” गाण्याची #hookstep शिकवतायेत… " असं कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताने फुलवंती गाण्यातील डान्स कसा आहे. यांच्या हुकस्टेप्स करून दाखवल्या आहेत. तसेच प्राजक्ताने या गाण्यावर डान्स करून तिला टॅग करण्याचे आवाहन केले आहे. प्राजक्ता माळी या व्हिडीओ तिच्या अकाउंटवर पोस्ट करणार आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्याकडून लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत. तर अनेकांनी फुलवंती या गाण्यावर डान्स स्टेप्स केल्या आहेत.

फुलवंती चित्रपटातील गाण्यामध्ये प्राजक्ताने तिच्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने भुरळ घातली आहे. प्राजक्ताचे सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. फुलवंती चित्रपटातील गाण्याचे लेखन विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे यांनी केले आहे. आर्या आंबेकर हिने गायले असून उमेश जाधव आणि प्राजक्ता माळीने नृत्य केले आहे. फुलवंती गाण्यातील प्राजक्ताच्या नृत्याच्या अदाकारीने आता प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT