Prajakta Mali Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ता माळीने प्रोडक्शन हाऊसचं नाव काय ठेवलं? 'त्या' नावाचा अर्थ काय?

Prajakti Mali Phullwanti Movie: प्राजक्ता माळी प्रोडक्शन हाऊसचं नाव कसं ठेवलं याबाबत मुलाखतीत सांगितलं आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्राजक्ता माळी यशस्वी अभिनेत्री आहे. अभिनेत्रीसह प्राजक्ताने नृत्यागंणा, निवेदिका, व्यवसायिका अशा विविध भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. प्राजक्ताचा फुलवंती हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटाची सहनिर्माती प्राजक्ता माळी आहे.

प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत असलेला फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. सध्या प्राजक्ता तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच सकाळ प्रिमियर चॅनलला प्राजक्ताने मुलाखत दिली. यावेळी प्राजक्ताला फुलवंती चित्रपटातील 'शिवोहम' हे नाव कसं ठेवलं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी प्राजक्ताने, "किती छान प्रश्न! खूप खूप धन्यवाद.. हा प्रश्न विचारल्याबद्दल.

कारण खूपच जिव्हाळ्याचं नाव आहे. मी गुरू परंपरा मानते. श्री शिश्रवेशरांची शिष्य मी आहे. आणि त्यांचे गुरू अदिशंकराचार्य त्यांनी लिहलेला हा श्लोक आहे. शिश्रवेशरांच्या शिष्याने त्यांना विचारलेला हा प्रश्नाचे उत्तर या नावामध्ये आहे. एकदा शिश्रवेशरांच्या शिष्याने त्यांना, कोहम् म्हणजे तुम्ही कोण आहात? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी, मी कोण आहे म्हणजेच ना मी हे शरीर आहे, ना मी हा आत्मा आहे, ना मी हे मन आहे. ना मी हे जे बोलते, चालतो ते आहे. तर मी कोण आहे मी शिवा आहे. जो इकडे तिकडे कुठेही नसून माझ्या मनात आहे.

प्राजक्ताने याबाबत सांगितले की, अदिशंकराचार्याचे श्लोक मी पठण करते आणि यामुळेच मी हे नाव ठेवलं आहे. आदिशंकराचार्य यांनी त्यांनी लिहलेल्या एका श्लोकामध्ये ही माहिती दिली होती. प्राजक्ता माळी ही फार पूर्वीपासूनच त्यांनी शिष्य आहे. ती नेहमी त्यांचे श्लोक पठन करते. प्राजक्तावर त्यांचा खूप प्रभाव आहे. त्यामुळेच तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवताना त्यांची शिकवण फॉलो केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दराडेंचा पराभव करणारे गोकुळ गिते शिंदेसेनेत जाणार? मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये विमानाने दाखल; घडामोडींना वेग

Maharashtra News Live Update: आता चौकार नाही तर षटकार मारला-एकनाथ शिंदे

रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत बनवा 'दही चटणी सँडविच', सोपी आहे रेसिपी

Crime: नवऱ्यासमोर बायकोवर सामूहिक बलात्कार, आरोपींकडून पीडितेच्या गुप्तांगावर अनेक वार

कोचिंग सेंटरला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडकीतून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT