Adipurush Trailer Dialogues
Adipurush Trailer Dialogues Saam TV
मनोरंजन बातम्या

Adipurush Dialogues: 'गाड़ दो अहंकार की छाती में विजय का भगवा ध्वज', 'आदिपुरुष'मधील संवाद ऐकून अंगावर येईल शहारा

Pooja Dange

Adipurush Trailer Dialogues: प्रभास-क्रिती सेनन याच्या बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रभास-क्रितीसह या चित्रपटामध्ये सनी सिंह आणि देवदत्त नागे देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमुळे निर्माण झालेल्या वाद आणि टीका लक्षात घेऊन निर्माते आणि दिग्दर्शक पुढील पावले अगदी जपून टाकत आहेत. त्यामुळे टीजर आणि नुकताच प्तादर्शित झालेला ट्रेलर निर्मात्यांनी खूप विचारपूर्वक बनवला आहे.

'आदिपुरुष' चित्रपटाच्या टीझरपेक्षा ट्रेलर अधिक दमदार आणि रोमांचित करणारा आहे. मनोज मुतंशिर यांनी या चित्रपटाचे संवाद (डायलॉग) लिहिले आहेत. चित्रपट दमदार डायलॉगची खालक आपल्याला ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलरमधील सर्व दमदार डायलॉग रामाच्या भूमिकेतील प्रभासचे आहेत. बाहुबली चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटामध्ये देखील हिंदीमध्ये शरद केळकरने प्रभासला आवाज दिला आहे. (Latest Entertainment News)

शरद केळकरच्या आवाज आणि त्याची डायलॉग बोलण्याची शैली आपल्याला माहीत आहे. त्यामुळे 'आदिपुरुष' चित्रपटातील हे डायलॉग खूपच जिवंत वाटत आहेत.

'आदिपुरुष' चित्रपटाच्या ट्रेलरमधील दमदार डायलॉग

‘जानकी में मेरे प्राण बसते हैं और मर्यादा मुझे अपने प्राणों से भी अधिक प्रिय है’- प्रभास

‘हम जन्म से नहीं कर्म से छोटे या बड़े होते हैं’- प्रभास

‘राघव ने मुझे पाने के लिए शिव धनुष तोड़ा था, अब उन्हें रावण का घमंड तोड़ना होगा.’- कृति सेनन

‘आज मेरे लिए मत लड़ना, उस दिन के लिए लड़ना, जब इतिहास में तुम्हारा नाम पढ़कर सम्मान से सिर झुक जाएंगे…लड़ोगे..तो आगे बढ़ो और गाड़ दो अहंकार की छाती में विजय का भगवा ध्वज’- प्रभास

‘ब्रह्मांड में जो भी पाने लायक है, तू पा चुका है..फिर भी तू राक्षस ही है…लक्ष्मी को पाले, नारायण हो जाएगा.’- सैफ अली खान

चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि जय श्री राम जय श्री रामचा आवाज प्रेक्षकांना भुरळ घालण्यास पुरेसा आहे. हा चित्रपट 16 जूनला जूनला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: 'या' पदार्थंसोबत चुकूनही लिंबाचे सेवन करू नये

Vrat Recipe: व्रतासाठी 'या' सोप्या पद्धतीने बनवा खुसखुशीत थालीपीठ

Avinash Jadhav CCTV : सराफाच्या मुलाकडे 5 कोटींची खंडणी मागितल्याचा MNS नेत्यावर आरोप! मारहाणीचं सीसीटीव्ही समोर

Rohit Pawar News: रोहित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का! कट्टर समर्थकाने सोडली साथ; अजित पवार गटात प्रवेश

Gold Prices Decline : सोन्याचे दर गडगडले; दागिन्यांसाठी दुकानात नागरीकांची गर्दी, वाचा महाराष्ट्रातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT