Aho Vikramaarka Canva
मनोरंजन बातम्या

Aho Vikramaarka Movie: बाहुबलीच्या कालकेयची मराठीत धमाकेदार एन्ट्री

Aho Vikramaarka Movie Release Date: ‘बाहुबलीः द बिगिनिंग' चित्रपटामधील कालकेय’ त्याच्या खलनायकाच्या भूमिकेमुळे नवी ओळख मिळाली होती. मात्र अता अभिनेता प्रभाकर मराठमोठ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या घोषणेमुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुक्ता निर्माण झालीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

‘बाहुबलीः द बिगिनिंग’मध्ये मुख्य भूमिकांसोबतच या सिनेमातील खलनायकाची म्हणजे कालकेयची भूमिकाही प्रचंड गाजली. त्याच्या अभिनयासाठी चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले. त्याने साकारलेल्या ‘कालकेय’ च्या भूमिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली. या चित्रपटानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभाकर याने सिद्ध केलं की तो कोणत्याही व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारू शकतो. हाच ‘कालकेय’ म्हणजे अभिनेता प्रभाकर आता मराठीत दिसणार आहे. ३० ऑगस्ट रोजी देव गिल प्रॉडक्शन यांचा ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

‘अहो विक्रमार्का’ या अॅक्शनपटात अभिनेता प्रभाकर एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘बेगाडा’ ही तगडी खलनायिका भूमिका तो साकारताना पहायला मिळणार आहे. 'अहो विक्रमार्का’ पहिला मराठी ब्लॉकबस्टर-पॅन इंडिया चित्रपट ३० ऑगस्टला ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा दिग्दर्शित ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात इमोशन्स, सूडनाट्य, आणि ड्रामा असलेला ‘अहो विक्रमार्का’ जबरदस्त अ‍ॅक्शनपट असणार आहे. नायकाची आणि खलनायकाची जुगलबंदी सर्व प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करते. बलदंड शरीरयष्टी, भारदस्त आवाजाच्या जोरावर भेदक नजर, आणि डायलॉग बोलण्याची अनोखी अदा या जोरावर ‘बेगाडा’ हा खलनायक चित्रपटात जबरदस्त रंग भरणार आहे.

आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा निर्मित या चित्रपटाची कथा पेनमेत्सा प्रसादवर्मा यांची आहे, तर संगीत रवी बसरूर आणि आर्को प्रावो मुखर्जी यांनी दिले आहे, छायांकन करम चावला आणि गुरु प्रसाद एन यांनी केले आहे आणि संकलन तम्मीराजू यांनी केले आहे.‘अहो विक्रमार्का' हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो एकाच वेळी मराठी आणि तेलगु या दोन भाषेत चित्रित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

SCROLL FOR NEXT