New Serials Start In Zee Marathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zee Marathi Serials: 'झी मराठी'चे TRP साठी मोठे पाऊल; 'त्या' जुन्या मालिका पुन्हा बघायला मिळणार

काही जुन्या मालिका पुन्हा एकदा नव्याने सुरु करण्याचा निर्णय झी मराठीने घेतला आहे.

Chetan Bodke

Zee Marathi Serials: मराठी टेलिव्हिजनवरील अनेक जुन्या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन आहेत. सोबतच अनेक मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असूनही कालांतराने त्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातीलच काही जुन्या मालिका पुन्हा एकदा नव्याने सुरु करण्याचा निर्णय झी मराठीने घेतला आहे. झी मराठीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करीत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून झी मराठी आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी विविध शैलीतील मालिका घेऊन येत आहेत. या मालिकांच्या हटक्या विषयांमुळे अनेक प्रेक्षक त्याला पसंती देत आहेत. येत्या काही दिवसांत झी मराठीवरील दोन जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

येत्या १३ फेब्रुवारी २०२३ पासून ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जाणार आहे. संध्याकाळी ४ आणि ५ वाजता अनुक्रमे या मालिका प्रसारित केल्या जाणार आहेत. मनोरंजन मराठी या इन्स्टाग्राम पेजने याबद्दलची माहिती दिली आहे. "पुन्हा एकदा अनुभवा श्री-जान्हवी आणि जय-आदितीची प्रेम कहाणी" असे कॅप्शन देत शेअर केले आहे.

दरम्यान प्रेक्षकांनी चॅनलकडे केलेल्या आग्रहाखातर या मालिका पुन्हा एकदा प्रसारित केल्या जाणार असल्याची सध्या चर्चा आहे. तर दुसरीकडे झी मराठी वाहिनीचा घसरलेला टीआरपी सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल झी मराठी या चॅनलकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

SCROLL FOR NEXT