Sonali Chakraborty Death  Saam TV
मनोरंजन बातम्या

Sonali Chakraborty : मनोरंजन क्षेत्रावर शोककळा! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचे निधन

मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचं निधन झालं आहे.

Satish Daud

Sonali Chakraborty Death : मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सोनाली चक्रवर्ती यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या जाण्यानं बंगाली टेलिव्हिजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

सोनाली अनेक दिवसांपासून यकृताच्या समस्येने त्रस्त होत्या. सोनाली यांचे काम प्रामुख्यानं बंगाली मनोरंजन विश्वात होते. आज म्हणजेच सोमवारी सकाळी कोलकाता येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या सोनाली चक्रवर्तीचा मोठा चाहतावर्ग होता. वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती.

सोनाली यांच्या निधनावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. सोनाली ह्या अभिनेत्री सोलंकी रॉय आणि गौरव चॅटर्जी यांची प्रमुख जोडी असलेल्या बंगाली मेगा सीरियल गचोरा चा एक भाग होत्या. त्यांनी या मालिकेत सोलंकीच्या मावशीची भूमिका साकारली होती, हे पात्र बंगाली समाजात खूप लोकप्रिय आहे.

याशिवाय सोनाली यांनी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले. २००२ साली आलेल्या 'हार जीत' या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. याशिवाय 'बंधन' या सिनेमातील त्यांची भूमिकाही गाजली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सर्वच कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीठ आणि पाण्याच्या गुळण्यांनी दातांच्या समस्या होतील दूर! तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांची सूज घालवण्यासाठी 'असा' करा वापर

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई न करण्याचे निर्देश कृषी विभागातर्फे देण्यात आले असताना शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू

Skin Fasting: एक दिवस करा फेस फास्टिंग, चेहरा होईल नॅचरली ग्लो, सगळ्याच्या नजरा तुमच्यावरच खिळतील

ठाणेकरांवर पाणीसंकट ? अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Jalgaon Tourism: माथेरान-महाबळेश्वरही पडेलं फिकं! जळगावपासून फक्त 284 किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

SCROLL FOR NEXT