Poonam Dubey Viral Video  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Dubey: चलो, थोडी आग लगाए...पूनमच्या बोल्डनेसनं ओलांडल्या सर्वच मर्यादा, VIDEO पाहून अंगाची होणार काहिली...

पूनम दुबे हिने बीचवर फोटोशूट केला असूून त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Poonam Dubey Viral Video: भोजपुरी अभिनेत्री पूनम दुबे तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते. सध्या पुनम बीचवर सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. पूनम दुबे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. पूनम दुबे हिने भीगा भीगा हैं समा या गाण्यावर डान्स केला आहे. तसेच या डान्सचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून तिचा हा व्हिडिओ फॅन्सला प्रचंड आवडला आहे.

पूनम दुबे हिने बीचवर फोटोशूट केला असूून त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, समुद्रासारखा गोंधळ आणि समुद्रासारखी शांतता या जगात कुठेही नाही. पूनमने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, 'हवामानात गारवा आहे, चला थोडी आग लावूया.' (Social Media)

पूनमने शेअर केलेल्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये ती खूप बोल्ड अवतारत दिसत आहे. तिचे आऊटफिट बोल्ड आहेतच परंतु तिच्या अदासुद्धा चाहत्यांना वेड लावतील अशा आहेत. पूनमच्या या व्हिडिओ आणि फोटोंनी चाहत्यांच्या हृदयात आणि सोशल मीडियावर खरंच आग लावली आहे. पूनमच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक भोजपुरी कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. (Viral Video)

पूनम दुबे ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. पूनमने खेसारी लाल यादव यांच्यासोबत 'जो जीता वही सिकंदर'मध्ये काम केले आहे. याशिवाय तिने भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पवन सिंहसोबत 'हम हैं लुटेरे'मध्येही उत्तम अभिनय केला आहे. पूनम ही प्रयागराजची रहिवासी असून ती मिस अलाहाबाद देखील राहिली आहे. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

घरी बोलवायचा, अश्लील भाषेत बोलायचा, स्टेशन मास्तरचा संतापजनक प्रकार; महिलेची मनसेकडे तक्रार अन् पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT