Pooja Bhatt Slams Trollers Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Bhatt And Mahesh Bhatt News: पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांच्या नात्यावर नेटकऱ्याची अश्लील कमेंट, अभिनेत्रीने संतप्त होतं ट्रोलरला दिलं जबरदस्त उत्तर

Pooja Bhatt News: एका नेटकऱ्यानं पूजा भट्टला वडीलांबाबत आक्षेपार्ह प्रश्न विचारला.

Chetan Bodke

Pooja Bhatt Slams Trollers

‘बिग बॉस ओटीटी २’ फेम अभिनेत्री पुजा भट्ट सध्या तुफान चर्चेत आली आहे. जरीही ती ग्रँड फिनालेमध्ये आपल्या यशस्वी खेळीने पोहोचली असली, तरी मात्र विजेतेपदाची जिंकण्यात तिला अपयश मिळालं. अशातच पुजा भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत असून तिला एका नेटकऱ्यानं तिच्या वडीलांबाबत आक्षेपार्ह प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर अभिनेत्रीने त्याला जबरदस्त उत्तर देत त्याची बोलती बंद केली आहे.

सोशल मीडियावर आलिया भट्ट कायमच चर्चेत असते. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक कलरचं टी- शर्ट आणि जीन्स घातलेली दिसून येत आहे. तिच्या या पोस्टवर एका नेटकऱ्यानं ७० च्या दशकामधील अभिनेत्री परवीन बाबीसोबतच्या महेश भट्ट यांच्या रिलेशनशिपचा उल्लेख केला.

त्या युजरने कमेंट केली की, “अंधाऱ्या रात्री तुझ्या वडिलांच्या मागे निर्वस्त्र होऊन धावत असलेल्या परवीन बाबीचे किस्से सांगत आहेत. त्यांच्या अहंकार आणि पराक्रमांना संतुष्ट करण्यासाठी एखाद्याच्या भावनांचा वापर करू शकतात. तुला माहित आहे का, की महेश भट्ट यांनी त्यांच्या अहंकारासाठी तुझ्या शरीराचा वापर केला नाही. काय विडंबना आहे ही. अनेक जण आपल्या अहंकारासाठी, इतरांच्या निष्पाप भावनांचा वापर करतात.”

त्या ट्रोलरला उत्तर देत पुजा भट्ट म्हणाली, “देवाचा आशीर्वाद कायमच तुमच्या पाठीशी असुदे, तुमची या द्वेषाच्या अंधारापासून सुटका होऊ दे. तुमच्या पाठी कायमच माझ्या शुभेच्छा आहेत, तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी अपेक्षा करते.” ट्रोलरने जरी घाणेरड्या पद्धतीने कमेंट केली असली तरी, पूजा भट्टने अगदी संयमाने उत्तर दिलंय.

सध्या अभिनेत्रीची कमेंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या कमेंटवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो, ट्रोलरने आपली अक्षरश: पातळी ओलांडलीय. तर आणखी एक जण कमेंट करत म्हणतो, अशा पद्धतीची ट्रोलिंग थांबायला हवी, आणि त्या विरोधात योग्य ती कारवाई व्हायला हवी’, अशी मागणी नेटकऱ्याने केलीय.

Pooja Bhatt Slams Trollers

दरम्यान, महेश भट्ट यांच्याबद्दल सांगायचे तर, १९७० मध्ये महेश भट्ट आणि किरण भट्ट यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर महेश भट्ट आणि किरण भट्ट यांना, पूजा आणि राहुल अशी दोन मुली होती. तर १९८६ मध्ये महेश यांनी राझदान यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. तर राझदान यांच्यापासून महेश भट्ट यांना आलिया आणि शाहीन अशी दोन मुलं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT