K Viswanath Saam Tv
मनोरंजन बातम्या

PM Modi Pays Tribute: PM मोदींनी वाहिली के विश्वनाथ यांना श्रद्धांजली

के विश्वनाथ यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Pooja Dange

PM Modi pays tribute to K Vishwanath: तेलगू चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. के विश्वनाथ गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. हैदराबादमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. २०१६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.

के विश्वनाथ यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत के विश्वनाथ यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 'श्री के. विश्वनाथ यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. सिनेमाच्या दुनियेतील तो एक दिग्गज, एक सर्जनशील दिग्दर्शक आणि बहु-प्रतिभावान माणूस आहे ज्याने सिनेमाच्या जगात स्वतःसाठी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. विविध विषयांवरील त्यांच्या चित्रपटांनी अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

SCROLL FOR NEXT