राज कुंद्राकडे तयार होता ‘प्लॅन बी’; 'हा' होता प्लॅन Saam Tv
मनोरंजन बातम्या

राज कुंद्राकडे तयार होता ‘प्लॅन बी’; 'हा' होता प्लॅन

व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून खुलासा

सूरज सावंत

मुंबई - पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणाऱ्या रॅकेट प्रकरणात गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षात सोमवारी रात्री उशिरा उद्योगपती व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्रा Raj Kundra याला अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणातमुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान या पॉर्न फिल्म्स प्रकरणी राज कुंद्रासह रायन जॉर्न थाँर्प याला देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांना आता २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

आता पॉर्न चित्रपट आणि पॉर्न अ‍ॅप प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली. पॉर्न बंद केले जाईल याची पूर्व कल्पना राज कुंद्राला आधीच आली होती, असे या चौकशीतून समोर आले आहे.राजने त्याआधी त्यासाठी पूर्वतयारी केली होती. एवढंच नव्हे तर राजने ‘प्लॅन ‘बी’देखील यासाठी तयार केला होता.

अटकेनंतर राज कुंद्राचे व्हाट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये राज कुंद्रा रॅकेटमधील सहकाऱ्यांशी प्लॅन बी बद्दल बोलल्याचे स्पष्ट झाले आहे.१८ नोव्हेंबर २०२० रोजी, ‘हॉटशॉट’ हे अ‍ॅप सस्पेंड करण्यात आले होते. असे काही होईल याची कल्पना राजला आधीच होती आणि त्यामुळे त्याने प्लॅन बी तयार केला होता.

हे देखील पहा -

या सगळ्याची चर्चा ‘एच’ नावाच्या ग्रुपवर झाली होती. प्रदीप बक्षीने एक पीडीए फाईल शेअर केली होती ज्यात ‘हॉटशॉट’ अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.  अ‍ॅप बंद झाल्यानंतर राज कुंद्रा हा टेन्शन मध्ये नव्हता. तेव्हा तो म्हणाला होता की आता प्लॅन बी सुरु झाला आहे.

नवीन अ‍ॅप  जास्तीत जास्त २ ते ३ आठवड्यांमध्ये सुरु होणार आहे. जो पर्यंत आपलं नवीन अ‍ॅप  येत नाही. तो पर्यंत आपण व्हिडिओ डीएक्टिवेट करू असे देखील चॅट मधून समोर आले आहे.‘बी’ प्लॅनचे नाव बोलिफेम आहे. पोर्न इंडस्ट्रीला नव्या दिशेने नेता यावे यासाठी राज कुंद्राने हा प्लॅन तयार केला होता. राज कुंद्रा आणि बक्षीतील हे चॅट पोलिसांना कामतच्या फोनमध्ये मिळाले आहेत.

दरम्यान, 11 ऑक्टोबरला  या रॉकेटला किती नफा झाला त्याचाही चॅटमध्ये उल्लेख आहे.

11 आँक्टोबरला

Total order - 2139

Total coins - 4, 77, 687/-

Total sale - 6 , 37, 932/-

MTD sale Of which - 34, 20, 387/- 

Live Revenue - 1, 85, 859/-                                                                               

Movie sale - 4, 52, 073/- 

हा मेसेज पडल्यावर राज कुंद्रा नेह पाहिल्यावर सर्वांचे अभिनंदन देखील केले आहे. तर सायबर पोलिसांनी काही अ‍ॅपला काही महिन्यांपूर्वी अश्लील व्हिडिओ अ‍ॅप वर दाखवल्या प्रकरणी समन्स बजावले होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transfer: २८ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील पोलीस विभागात मोठा फेरबदल

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना पक्षातूनच आव्हान, अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी हालचाली; महाराष्ट्रातील मास्टरमाईंड कोण?

Raigad Crime: रायगड हादरलं! झोपलेल्या ५ वर्षाच्या मुली पळवलं,नंतर चिमुरडीचा घेतला जीव

PM Modi : पुतिन न्यूक्लियर अटॅक करणार होते, पण मोदींनी थांबवलं; जगाच्या राजकारणात खळबळ उडवणारा दावा

Wednesday Horoscope : डोकं शांत ठेवा, ५ राशींची होणार चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT