Prajakta Mali  SAAM TV
मनोरंजन बातम्या

महाराष्ट्रावर अन् कलेवर प्रेम नसतं तर आता Prajakta Mali कुठे असती? स्वतः केला खुलासा, 'तो' व्हिडीओ चर्चेत

Prajakta Mali Post : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. महाराष्ट्रावर आणि कलेवर प्रेम नसते तर आता फुलवंती कुठे असती याचा खुलासा तिने स्वतः त्या व्हिडीओतून केला आहे.

Shreya Maskar

सध्या प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'फुलवंती'ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्राजक्ताने प्रेक्षकांना वेड लावले आहे. थिएटरनंतर आता 'फुलवंती' ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. अशात नुकताच प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिने बंगळुरू आश्रमाला भेट दिली आहे आणि आश्रमातून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ प्राजक्ता सांगते की, जर महाराष्ट्रावर अन् कलेवर प्रेम नसतं तर ती आता नक्कीच बंगळुरू आश्रमात आश्रमवासी असते. या पोस्टला तिने हटके कॅप्शन देखील दिलं आहे. तिने लिहिलं की, "महाराष्ट्रावर आणि कलेवर इतकं प्रेम नसतं तर ह्या घडीला मी बंगळुरू आश्रमात आश्रमवासी असते. होय होय…इथे राहणं, ध्यान करणं इतकं मला आवडतं. आश्रमवासी नाही होऊ शकले तरी निदान १५-२० दिवस इथे सेवा करायला नक्कीच येईन. आणि सातत्याने इथे येत राहीन."

प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टला चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, "ती आता आर्ट ऑफ लिव्हिंग बंगळुरू आश्रमात आहे आणि तेथे सत्संग सुरू होणार आहे. प्राणायाम, ध्यान आणि योग आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आपल्याला शिकवते. यांचे बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स आहेत. चार महिन्यातून एकदा हा कोर्स करावा. मी स्वतः हा कोर्स आश्रमात राहून पूर्ण केला आहे. "

प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असते. ती नियमित योगा आणि प्राणायाम करते. यामुळे प्राजक्ता एवढी उत्साही आणि सुंदर दिसते. प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 2.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: डोवालांच्या टिप्समुळे १३ बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा - अमित शहा

Marriage Tips: पत्नीला नवऱ्याच्या या सवयी अजिबात आवडत नाहीत, तुमच्यातही आहेत का?

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT