मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: कामातून वेळ काढून तुझ्याकडे येईलच, प्राजक्तानं कुणाला केलं प्रॉमिस?

Prajakta Mali Farmhouse: प्राजक्ता तिच्या भाच्यांसोबत तिच्या फॉर्मंहाऊवर गेली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताने फोटो शेअर केले आहेत.

Manasvi Choudhary

अभिनेत्री प्राजक्ता माळी अभिनेत्रीसोबतच उत्तम कवयित्री, बिझनेसवुमन आहे. प्राजक्ताचं कर्जतमध्ये खूप मोठे फार्महाउस आहे. प्राजक्ताच्या फार्महाउसचे नाव प्राजक्तकुंज असे आहे. फार्महाउसमध्ये ३ बेडरुम, ४ बाथरुम आणि लिव्हिंग रुम आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता अपडेट देत असते. विविध पोस्ट शेअर करत प्राजक्ता कायमच तिच्या फार्महाऊसच्या आठवणी सांगते. नुकतंच सोशल मीडियावर प्राजक्ता माळीने एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता तिच्या भाच्यांसोबत तिच्या फॉर्मंहाऊवर गेली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताने फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये, मी माझ्या घरच्यांना प्रॉमिस केलं आहे की, प्रत्येक प्रोजेक्टनंतर शीण घालवण्यासाठी मी इथेच येणार, माझं दुसरं लाडकं घर... असं तिनं कॅप्शन दिलं आहे. फोटोमध्ये प्राजक्ता तिच्या लाडक्या भाच्यासोबत वेळ घालवताना दिसतेय.

कर्जतमध्ये प्राजक्ताचं प्राजक्तकुंज हे फॉर्म हाऊस आहे. निसर्गरम्य वातावरणात प्राजक्ताचं फार्महाऊस आहे. मागील अनेक दिवसांपासून फुलवंती चित्रपटामध्ये प्राजक्ता माळी व्यग्र होती. चित्रपटानंतर प्राजक्ता माळी आनंद घेण्यासाठी फार्महाऊसवर गेली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोवर सेलिब्रिटीसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्राजक्ताचे हे सुंदर फोटो पाहून अमृता खानविलकरने ‘प्रेम’ अशी कमेंट केली आहे. तर, “मी कधी यायचंय तिकडे” असा प्रश्न अभिनेत्री ऋतुजा बागवेने प्राजक्ताला विचारलं आहे. प्राजक्ताने सुद्धा तिला, “तू फक्त तारखा सांग…” असा रिप्लाय दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT