Pankaj Tripathi Dad Shraddha News Instagram
मनोरंजन बातम्या

Pankaj Tripathi Dad Shraddha: पंकज त्रिपाठींच्या वडिलांच्या श्राद्धाला फोटो काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड; गर्दी पाहून बाऊन्सर आले अन्... व्हिडिओ व्हायरल

Pankaj Tripathi News: पंकज त्रिपाठी यांच्या वडीलांच्या श्राद्धाच्या वेळी अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी झाली होती.

Chetan Bodke

Pankaj Tripathi Dad Shraddha News

बॉलिवूडचे बहुआयामी अभिनेता पंकज त्रिपाठी कायमच आपल्या बहुआयामी अभिनयामुळे चर्चेत असतात. सध्या पंकज त्रिपाठी ‘OMG 2’मुळे सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. अशातच सध्या ते आणखी एका कारणामुळे देखील चर्चेत आहेत.

पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे २१ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झालेय. त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. नुकतेच पंकज त्रिपाठी वडीलांचे उत्तरकार्य करण्यासाठी आपल्या गावी गेले होते.

यावेळी त्यांच्या वडीलांच्या श्राद्धाच्या वेळी अभिनेता पंकज त्रिपाठी यांना पाहण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी झाली होती. इतक्या गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी त्यांना बाऊन्सरची मदत घ्यावी लागली होती.

पंकज त्रिपाठी यांच्या वडीलांचे श्राद्ध कार्य १ सप्टेंबरला बिहारमधील बरौली येथील बेलसंद गावी पार पडले. यावेळी पंकज त्रिपाठी यांच्यासह त्यांच्या परिवाराच्या दु:खामध्ये सामील होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे, चिराग पासवान यांच्यासह अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पंकज यांच्या वडीलांना श्रद्धांजली देखील वाहिली.

काल दिवसभर अभिनेते, वडीलांच्या श्राद्धासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत, लोकांच्या भेटीगाठी घेण्यामध्ये मग्न होते. यावेळी अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात संख्या होती. यावेळी पंकज त्रिपाठींच्या आजुबाजुला असलेल्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी बाऊन्सरला पाचारण करावं लागलं होतं.

एका मुलाखतीमध्ये पंकज यांनी त्यांच्या वडीलांना ते करत असलेल्या कामामध्ये (अभिनयात) अजिबात रस नसल्याचे सांगितले. मुलगा पंकज त्रिपाठी सिनेसृष्टीत काय काम करतो याची माहितीही वडीलांना नव्हती. पंकज त्रिपाठी यांनी मुलाखतीत सांगितले की, वडील एकदाच मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांना मोठमोठी घरं आणि टोलेजंग इमारती आवडल्या नाहीत. (Latest Entertainment News)

पंकजने अभिनेता होऊ नये अशी इच्छा त्यांच्या वडीलांनी व्यक्त केली होती. आपल्या मुलाने व्यवस्थित शिक्षण घेऊन, डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडीलांनी इच्छा व्यक्त केली होती.

पंकज त्रिपाठींबद्दल बोलायचे तर, नुकतेच ते ‘OMG 2’मध्ये झळकले होते. सध्या अभिनेत्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोबतच चित्रपटाला मिळालेल्या यशाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. मनोरंजनसृष्टीमध्ये मानाचा समाजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची’ घोषणा २४ ऑगस्ट रोजी करण्यात आली. यावेळी मिमी चित्रपटासाठी पंकज त्रिपाठींना ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ या कॅटेगरीमध्ये ‘६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ हा पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्यांना वडीलांची खुप आठवण आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Maharashtra News Live Update: राणा सूर्यवंशी यांची प्रकृती अद्याप गंभीर,रुबी हॉल क्लिनिकची माहिती

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

Wednesday Horoscope : बुधवारी नशिबाची साथ, अडकलेली कामे होणार पूर्ण; कोणत्या राशींना मिळणार धनलाभ?

Maharashtra School Holidays: शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

SCROLL FOR NEXT