Parineeti Chopra Ring Instagram
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Ring News: अखेर परिणीती- राघवचा साखरपुडा झालाच? अभिनेत्रीच्या अंगठीने माजली एकच खळबळ

सोमवारी रात्री परिणीतीच्या अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Chetan Bodke

Parineeti Chopra Spotted With Ring: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. जरी या जोडप्याने त्यांच्यातील नाते अधिकृत जाहीर केले नसले तरी, पंजाबी गायक-अभिनेता हार्डी संधू सोबत आप खासदार संजीव अरोरा यांनीही ट्विट करून या जोडप्याचे अभिनंदन केले. लग्न आणि अफेअरच्या चर्चांवर परिणीतीने अद्यापही मौन बाळगले असले तरी, सध्या परिणीतीच्या एका अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर एका युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, परिणीतीच्या अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत असून तिच्या हातातील अंगठी पाहून अनेकांनी एंगेजमेंट झाली का? असा प्रश्न विचारत आहे.

सोमवारी रात्री सेलिब्रिटी मॅनेजर पूनम दमानिया यांच्या ऑफिसमध्ये परिणीती चोप्रा स्पॉट झाली. यावेळी तिने जिन्स आणि क्रॉप टॉप घातला होता. परिणीतीचा हा कॅज्युअल लूकमध्ये सर्वांचेच लक्ष स्वत: कडे वेधत आहे. ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्माईलही दिली. (Bollywood News)

तर खासदार राघव चड्ढा यांनी पत्रकारांशी नुकत्याच झालेल्या भेटीत आपल्या रुमर्ड वेडिंगवरील प्रश्नांना उत्तर देणं टाळले. मात्र, अलीकडेच गायक-अभिनेता हार्डी संधूने परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याला दुजोरा दिला होता. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

SCROLL FOR NEXT