Param Sundari vs Baaghi 4 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Param Sundari vs Baaghi 4 : 'परम सुंदरी' की 'बागी 4' बॉक्स ऑफिसवर कोणाची हवा? टायगर श्रॉफच्या चित्रपटाने 5व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Param Sundari vs Baaghi 4 Box Office Collection : 'परम सुंदरी' आणि 'बागी 4' एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत. सोमवारी दोन्ही चित्रपटांनी किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'परम सुंदरी' चित्रपट 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'बागी 4' चित्रपट 5 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'बागी 4' चित्रपट मागून येऊन 'परम सुंदरी' ला तगडी टक्कर देत आहे.

बॉक्स ऑफिसवर दोन प्रेमकथा तुफान गाजत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra ) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) 'परम सुंदरी' (Param Sundari) चित्रपट 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर दुसरीकडे टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) 'बागी 4' (Baaghi 4) 5 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. 'परम सुंदरी' हा रोमँटिक - कॉमेडी ड्रामा 2 आहे. तर 'बागी 4'मध्ये ॲक्शन आणि रोमान्सचा धमाका पाहायला मिळत आहे. 'बागी 4' चित्रपट मागून येऊन 'परम सुंदरी' ला तगडी टक्कर देत आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'परम सुंदरी' चित्रपटाने 12 दिवसांत 47.60 कोटी रुपये कमावले आहे. तर 'बागी 4'ने 39.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'परम सुंदरी' चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा पूर्ण करणार आहे. तसेच भविष्यात 'बागी 4' चित्रपट 'परम सुंदरी'चा रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे बोले जात आहे.

'परम सुंदरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 12

  • दिवस पहिला - 7.25 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 9.25 कोटी रुपये

  • दिवस तिसरा - 10.25 कोटी रुपये

  • दिवस चौथा - 3.25 कोटी रुपये

  • दिवस पाचवा - 4.25 कोटी रुपये

  • दिवस सहावा - 2.85 कोटी रुपये

  • दिवस सातवा - 2.65 कोटी रुपये

  • दिवस आठवा - 1.75 कोटी रुपये

  • दिवस नववा - 2 कोटी रुपये

  • दिवस दहावा - 2.5 कोटी रुपये

  • दिवस अकरावा - 0.75 लाख रुपये

  • दिवस बारावा - 0.85 लाख रुपये

  • एकूण - 47.60 कोटी रुपये

'बागी 4' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

  • दिवस पहिला - 12 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 9 कोटी रुपये

  • दिवस तिसरा - 10.25 कोटी रुपये

  • दिवस चौथा- 4.25 कोटी रुपये

  • दिवस पाचवा - 4 कोटी रुपये

  • एकूण - 39.75 कोटी रुपये

'परम सुंदरी' VS 'बागी 4'

मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये आणि 'बागी 4' 200 कोटी रुपये आहे. 'परम सुंदरी' चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे. तर 'बागी 4' ए. हर्ष दिग्दर्शित चित्रपट आहे. बागी फ्रँचायझीचा 'बागी 4' सीक्वल असून हरनाज संधू हिने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.'बागी 4' चित्रपटात टायगर श्रॉफसोबत सोनम बाजवा,संजय दत्त आणि हरनाज संधू हे मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझी साक्षी कुठं गेली? कॉलेजवरून घरी आली, खोलीत गेल्यानंतर...; MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, आईने फोडला टाहो

Jio Recharge Plan: ८४ दिवसांसाठी जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन; कॉलिंग, मेसेजिंग अन् बरंच काही, किंमत किती?

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Metro 3 : आजपासून मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत, कोणकोणत्या स्थानकावर थांबणार, तिकिटी किती असणार? वाचा

Maharashtra Politics: अजित पवार छगन भुजबळांवर नाराज, नेमकं काय घडलं बैठकीत? VIDEO

SCROLL FOR NEXT