Kiara Advani and Sidharth Malhotra Instagram @sidmalhotra
मनोरंजन बातम्या

Sidharth And Kiara Wedding: अखेर ठरलं, सिद्धार्थ- कियारा ६ फेब्रुवारीला घेणार सात फेरे, पापाराझींनीच केला खुलासा

Sidharth Malhotra and Kiara Advani's Wedding: पापाराझींच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची जोरदार चर्चा.

Pooja Dange

Sidharth and Kiara Marriage in Jaisalmer: सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. परंतु बॉलिवूडमधील या जोडप्याने यावर अधिकृत माहिती दिलेली नाही. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

प्रसिद्ध पापाराझी विरल भयानी सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न कवर करण्यासाठी जात आहे. विरल भयानी या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या पोस्टासह कॅप्शनमध्येही असे मेन्शन केले आहे. त्यांच्या या पोस्टवरून सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या बातम्यांवर पूर्णविराम लागला आहे.

सध्या सोशल मीडियामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचे हे स्टार कपल ६ फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या या वृत्ताला अद्याप या दोघांनी अधिकृतरीत्या सांगितले नाही.

परंतु सूर्यगढ पॅलेसने पापाराझी अकाउंट विरल भयानीच्या पोस्टवर कमेंट केली आहे. या कमेंटमुळे सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. पापाराझी अकाउंट विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट लिहिली, 'आम्ही कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाचे कवर करण्यासाठी जैसलमेरला जात आहोत.'

विरल भयानी या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या सिद्धार्थ-कियाराच्या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, 'आमची एक टीम जोधपूर विमानळावर थांबेल जे पाहुणे चार्टर विमानाने येणार अहित त्यांना तिथे कवर करू. बाकीचे फोटो बहुतेक स्टार्स अपलोड करतात, ज्याची आम्ही वाट पाहू असतो. पण यावेळी आम्हाला ही संधी मिळाली आहे. 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न होणार आहे.'

विरल भयानीच्या या पोस्टवर कमेंट करत सूर्यगढ पॅलेसने सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाला दुजोरा दिला आहे. सूर्यगढ पॅलेसच्या अधिकृत इन्स्टा हँडलने कमेंट लिहिले आहे, "लवकरच भेटू."

याआधी बातम्या आल्या होत्या की, 'सिद्धार्थ आणि कियारा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. दोघेही ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. 5 फेब्रुवारीला त्यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स होणार आहेत, जिथे त्यांचे पाहुणे आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित असतील.

मिळालेल्या वृत्तानुसार, शाहरुख खानचा अंगरक्षक यासीन, लग्नाची सुरक्षा व्यवस्था पाहणार आहे. मिळालेल्या अहवालानुसार, पाहुणे ३ फेब्रुवारीला येण्याची शक्यता आहे. करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर, मीरा राजपूत यांसारखे अनेक बॉलिवूड दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT