Fukrey 3 Box Office Collection Day 1 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fukrey 3 Box Office Collection: चुचा, हनी आणि भोली पंजाबनने गाजवले बॉक्स ऑफिस; 'द वॅक्सीन वॉर'ला मागे टाकत 'Fukrey 3'ची दमदार सुरुवात

Fukrey 3 Movie Collection: 'फुकरे ३' चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपट लीक झाल्याची चर्चा होती.

Pooja Dange

Fukrey 3 Box Office Collection Day 1:

'फुकरे ३' हा कॉमेडी चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. 'फुकरे' या चित्रपटाचा हा ३ रा भाग आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

'फुकरे ३' या चित्रपटामध्ये रिचा चड्ढा, वरून शर्मा, पुलकित सम्राट, मनजोत सिंग, पंकज तिवारी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या कलाकारांच्या तुफान कॉमेडीला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

'फुकरे ३' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८.५० कोटींचे कमाई केली असे Sacnilk च्या वृत्तात लिहिले होते. तर नुकतेच चित्रपट समिक्षक तरन आदर्श यांनी ट्वीट करत चित्रपटाने ८.८२ कलेक्शन केल्याचे म्हटले आहे.

या चित्रपटासह विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द वॅक्सीन वॉर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने १.३ कोटींची कमाई केली आहे.

२०१७ साली प्रदर्शित झालेल्या 'फुकरे रिटर्न्स' चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.१० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने ८०.३२ कोटींचे एकूण कलेक्शन केले. 'फुकरे' चित्रपटाचा पहिला भाग २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ३६.५ कोटींची कमाई केली होती.

'फुकरे ३' चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपट लीक झाल्याची चर्चा होती. टेलिग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म हा चित्रपट लीक झाला होता. मात्र या लीक झालेल्या चित्रपटाच्या लिंकमध्ये चित्रपटाचे टीझर, ट्रेलर आणि गाणी असे मिळून २:३० तासाची लिंक तयार केली होती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

SCROLL FOR NEXT