Palak Tiwari On Mother Shweta Tiwari Saam Tv
मनोरंजन बातम्या

Palak Tiwari Dating: वयाच्या १५ व्या वर्षी बॉयफ्रेंड, डेटवर जाण्यापासून रोखण्यासाठी पलकला श्वेता तिवारी द्यायची धमकी

Palak Tiwari And Mother Shweta Tiwari News: चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पलकने तिच्या खासगी आयुष्यातील काही महत्वपुर्ण खुलासे केले आहेत.

Chetan Bodke

Palak Tiwari On Mother Shweta Tiwari: बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी देखील नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून पलक तिवारी नेहमीच नेटकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करते. पलकने गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं.

अनेक नवीन चेहरे असले तरी, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी खास कमाई करू शकला नाही. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने एका संकेतस्थळाला मुलाखत दिली, या मुलाखतीत तिने तिच्या बालपणातील किस्से शेअर केले.

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, पलकने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या बालपणातील किस्से सांगितले. पलकची आई श्वेताने तिला बॉयफ्रेंडसोबत पकडले होते, त्या दरम्यानचा किस्सा तिने मुलाखतीत सांगितला. मुलाखतीत पलक म्हणते, जेव्हा मी शाळेमध्ये होते त्यावेळी मी बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाण्यासाठी आईसोबत खोटे बोलायचे, त्यावेळी तिची आई श्वेता तिवारी जर खोटं बोलले तर, ते लगेचच पकडायची.

मुलाखतीत पलक तिवारी म्हणते, “मी त्यावेळी १५ ते १६ वर्षांची होते. शाळेत असताना माझ्या आयुष्यात बॉयफ्रेंड होता. आम्ही त्यावेळी अनेकदा मॉलमध्ये ही फिरायचो पण, मी एकदा माझ्या आईसोबत खोटं बोलले होते. आईसोबत खोटं बोललेय हे तिला कळल्यावर आई माझ्यावर प्रचंड चिडली होती. मला आधीपासून खोटं बोलता येत नाही, जर ते मी कधी बोलले तर आईने पटकन खोटं पकडायची.”

पलक पुढे मुलाखतीत म्हणते, “ मी आणि माझा बॉयफ्रेंड मॉलमध्ये जात होतो, तेव्हा मी आईला खाली खेळायला जात आहे, असं सांगितलं. त्यावर तिने परवानगी दिली. त्यावेळी आई बाहेर होती. नंतर तिला कुठूनतरी कळलं की मी खेळायला नाही तर, मॉलमध्ये गेलीय असे समजले. तिला माझा खूप राग आला होता. मी अनेकदा तिच्यासोबत खोटं बोलल्यामुळे ती मला गावी पाठवेल, माझे केस कापेल अशी धमकी द्यायची. मी लहान असताना, मला कोणीही डेट करू नये, या साठी तिने माझे कापले होते.”

मुलाखती दरम्यान, पलकने आपल्या लहानपणीच्या आठवणी आणि काही शाळेतल्या आठवणी ताज्या करताना अभिनेत्री दिसली. अनेकदा सोशल मीडियावर पलकचं नाव अनेकदा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबत जोडलंय, किंबहूना ते एकमेकांना डेट देखील करत असल्याची चर्चा आहे. मात्र या दोघांनीही त्यांच्या नात्यावर कुठलेही अधिकृत भाष्य केलं नसून त्यांनी काही वेळा बॉलिवूडच्या पार्ट्यांना एकत्रित हजेरी लावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात काकडी खाणे चांगले की वाईट

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

SCROLL FOR NEXT