Palak Tiwari And Ibrahim Ali News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Palak Tiwari And Ibrahim Ali : पलक तिवारीच्या फोटोंवर इब्राहिम अलीची जबरदस्त कमेंट, नेटकरी म्हणतात, "रिलेशनशिप कन्फर्म समजायचं का?"

Palak Tiwari And Ibrahim Ali News : पलक तिवारीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. फोटोंवर इब्राहिमने केलेल्या कमेंटची चांगलीच चर्चा होत आहे. ही कमेंट पाहून नेटकऱ्यांनी "रिलेशनशिप कन्फर्म समजायचं का?" अशी कमेंट केली.

Chetan Bodke

बॉलिवूडमध्ये नेहमीच स्टारकिड्सची चर्चा होताना पाहायला मिळते. सध्या काही स्टारकिड्सच्या रिलेशनची चर्चा होत आहे. श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याच्या रिलेशनची सध्या चर्चा होत आहे. हे कपल अनेकदा डिनर डेटला जाताना स्पॉट झालेले आहे. अशातच पुन्हा एकदा या कपलच्या रिलेशनची जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पलक तिवारीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. तिच्या फॅशनवर नेटकरी फिदा आहेत. पलकने शेअर केलेल्या फोटोंवर इब्राहिमने कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.

पलक तिवारी कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती नेहमीच स्टायलिश लूकमध्ये नवनवीन फोटो शेअर करत असते. अशातच नुकतंच पलकने काही नवीन फोटो शेअर केले आहेत. त्या पलकच्या फोटोंवर इब्राहिमने कमेंट केली आहे. त्याच्या कमेंटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पलकच्या या फोटोंवर इब्राहिमने 'लुकिंग गुड' अशी फायर कमेंट केली आहे. इब्राहिमची कमेंट पाहून नेटकऱ्यांमध्ये पलकच्या आणि इब्राहिमच्या रिलेशनची जोरदार चर्चा होत आहे.

ग्रीन स्वेटशर्ट आणि ग्रे रंगाची ट्रॅकपँट अशा सिंपल लूकमध्ये तिने फोटो शेअर केले आहेत. पॅलेससारखं वाटावं अशा ठिकाणी टेरेसवर तिने हे फोटोशूट केले आहेत. फोटोंमध्ये बॅकग्राऊंडला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे. पलक तिवारीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. इब्राहिम सोबतचं रिलेशनशिप कन्फर्म समजायचं का ? अशी कमेंट एका नेटकऱ्यांने केली. पटौदी पॅलेसमध्ये फोटो काढलेत का ? अशी कमेंट एका युजरने केली. तर अनेकांनी इब्राहिमची चेष्टा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT