Pasoori Fame Pakistani Singer Ali Sethi On Marriage Instagram
मनोरंजन बातम्या

Ali Sethi Marriage: ‘पसुरी’फेम गायकाने सलमानसोबत खरंच केलंय गुपचूप लग्न? सोशल मीडियावरून गायकानेच केला खुलासा

Ali Sethi And Boy Friend Salman Turi Marriage: ‘पसूरी’ फेम अली सेठीने त्याच्या बॉयफ्रेंडसोबत न्यूयॉर्कमध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली.

Chetan Bodke

Pasoori Fame Pakistani Singer Ali Sethi On Marriage: ‘पसूरी’ या गाण्याची क्रेझ फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही आहे. प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा गायक अली सेठी सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अली सेठीने त्याचा बॉयफ्रेंड आणि लोकप्रिय आर्टिस्ट सलमान तूरशी न्यूयॉर्कमध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली. त्याच्या गे मॅरेजनंतर (Gay Marriage)सोशल मीडियावर त्याची आणि त्याच्या बॉयफ्रेंडची तुफान चर्चा सुरू आहे.

अली सेठीच्या लग्नाच्या बातमीनंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गायक अली सेठीने त्याच्या लग्नाबद्दलची बातमी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो त्याच्या लग्नाविषयी बोलताना दिसतोय.

गायकाला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी समलैंगिक विवाह केल्यामुळे त्याला तुफान ट्रोल केलं जात आहे. नुकतंच अली सेठीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, पाकिस्तानी गायक शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, “ मी लग्न केलेलं नाही. माझ्या लग्नाची माहिती सोशल मीडियावर नेमकी कोणी पसरवली, हे माहित नाही. पण मला माहित आहे की, माझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याच्या प्रमोशनसाठी फायदेकारक ठरेल.” अभिनेत्याने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करताना त्यामध्ये, त्याच्या आगामी गाण्याची लिंक देखील दिली आहे.

Pasoori Fame Pakistani Singer Ali Sethi On Marriage

अली सेठीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो एक लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार असून त्याने आतापर्यंत अनेक अनेक गाणी देखील लिहिली आहेत. अली सेठचा चाहतावर्ग फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतासह आजुबाजुच्याही देशात आहे. पाकिस्तानी गायक अली सेठीने यापूर्वी ही सोशल मीडियावर लैंगिकतेविषयी खळबळजनक खुलासे आणि समलैंगिकतेबद्दल (Gay Marriage)देखील त्याने खळबळजनक वक्तव्य केली आहेत. यावेळी गायकाने लग्न न केल्याचा खुलासा केल्यामुळे अनेकांनी अली सेठीला प्रचंड ट्रोल केलंय.

अलीनं कोणाशी लग्न केलंय, सध्या याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. त्या सलमान तूर विषयी बोलायचे तर, तो पाकिस्तानात जन्मला असून सध्या तो अमेरिकेत राहायला आहे. सलमान तूर पेशाने अमेरिकेमध्ये पेंटर आहे. सध्या सलमान न्यूयॉर्कमध्ये राहत असून तिथेच व्यवसाय देखील करतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार. अली अजीज सेठी आणि सलमान तूर यांच्यातील मैत्री फारच घनिष्ठ आहे. सलमान आणि अलीची पहिली भेट ॲचिसन कॉलेजच्या (Aitchison Collage) आर्ट क्लासमध्ये झाली होती.

पण नेमकं त्या दोघांनी लग्न केलं आहे की नाही, याची अधिकृत बातमी समोर आलेली नाही. सोशल मीडियासह सर्वत्र त्यांच्या लग्नाच्या बातमीने त्यांचे चाहते आनंदी असून तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT