Mahira Khan Getting Marriage Instagram @mahirahkhan
मनोरंजन बातम्या

Mahira Khan Wedding: घटस्फोटाच्या 8 वर्षानंतर अभिनेत्री पुन्हा अडकणार विवाहबंधनात

Mahira Khan Married: माहिरा दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Pooja Dange

Mahira Khan Getting Marriage Next Month:

माहिरा खान पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भारतातही तिचे लाखो चाहते आहेत. 2017 मध्ये शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

एकेकाळी तिचे नाव रणबीर कपूरसोबतही जोडले गेले होते. सध्या माहिरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. माहिरा दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पुढच्या महिन्यात ती तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहिरा खान आणि सलीम करीम यांनी लग्नाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानच्या पंजाबमधील एक हिल स्टेशन निवडले आहे. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित असतील.

माहिरा तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये दोघे लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र, 'हमसफर'मधील या अभिनेत्रीने मात्र या वृत्तांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

माहिरा खान अनेक वर्षांपासून सलीम करीमसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आपले नाते जगाच्या लपवून ठेवले होते. मात्र, दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये आणि मित्रांसोबतच्या फोटोंमध्ये एकत्र पाहिले गेले. सलीम एक बिजनेसमॅन आहे. (Celebrity)

जिओ वेबच्या वृत्तानुसार, माहिरा खानच्या लग्नाच्या अफवांविषयी विचारले असता , तिची मॅनेजर अनुषाय तल्हा खान यांनी या बातम्यांना 'इरिस्पांसिबल जर्नलिज्म' असे म्हटले. तसेच या बातम्या अभिनेत्रीच्या कुटुंबीय किंवा टीम सदस्यांच्या अधिकृत वक्तव्याशिवाय प्रसिद्ध करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

माहिरा 2006 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये अली अस्करीला भेटली आणि त्यानंतर वर्षी दोघांनी लग्न केले. माहिराचे वडील या लग्नाच्या विरोधात होते. 2009 मध्ये माहिराने मुलगा अझलानला जन्म दिला. काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि 2015 मध्ये माहिराने तिचा पती अलीला घटस्फोट दिला. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT