OTT Release This Week Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release: विकीचा 'सॅम बहादूर' आणि रणबीरचा 'अ‍ॅनिमल', OTT वर 'या' आठवड्यात रिलीज होणार हे चित्रपट-सीरिज

Priya More

OTT Release Movie And Web Series:

ओटीटीवर (OTT) चित्रपट आणि सीरिज पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांनी आतापर्यंत चित्रपटगृहांमध्ये त्यांच्या आवडते चित्रपट पाहिले नाहीत. त्यांना आता घरी बसून चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. कारण या आठवड्यामध्ये अनेक चित्रपट आणि सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.

बरेच जण त्यांच्या आवडत्या वेब सीरिज आणि चित्रपटांची OTT वर रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. जानेवारीचा शेवटचा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक वेब सिरीज आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. या आठवड्यात कोणते चित्रपट आणि वेब सीरिज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत...

अ‍ॅनिमल -

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा पिता-पुत्राच्या नात्याभोवती फिरणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस आणि वर्ल्डवाइड जबरदस्त कमाई केली. आता हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

कर्मा कॉलिंग -

'कर्मा कॉलिंग' ही वेबसीरिज अलिबाग सोसायटीवर राज्य करणारी राणी इंद्राणी कोठारीभोवती फिरते आणि ही वेबसीरिज श्रीमंतांचे ग्लिट्ज आणि ग्लॅमरचे जग दाखवेल. ही वेबसीरिज 2011-2015 मध्ये प्रसारित झालेल्या अमेरिकन मूळ वेबसीरिज 'रिव्हेंज'वर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर २६ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होईल.

सॅम बहादूर -

'सॅम बहादूर' भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या कारकिर्दीने भारताच्या भू-राजकीय सीमांना कसा आकार दिला हे चित्रपट दाखवेल. या चित्रपटात विकी कौशल, फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

फाइट क्लब -

'फाईट क्लब' हा चित्रपट सेल्वा नावाच्या तरुण मुलाभोवती फिरतो. ज्याला फुटबॉलपटू व्हायचे आहे. परंतु काही कारणांमुळे त्याची स्वप्ने अपूर्ण राहतात. तो मारामारीत अडकून गुंडा बनतो. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 27 जानेवारी 2024 रोजी रिलीज होईल.

नेरू -

'नेरू' हा चित्रपट सारा या अंध शिल्पकारावर लक्ष केंद्रित करते. जी पक्षाघातानंतर न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कायदेशीर व्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी संघर्ष करत आहे. या चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर प्रियमणी, अनस्वरा राजन, सिद्दीकी, शांती आणि जगदीश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हे डिस्ने प्लस हॉटस्टारवर 23 जानेवारी 2024 रोजी रिलीज होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात !

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

Indian Army Job: बक्कळ पगार अन् इंडियन आर्मीत नोकरी करण्याची संधी; अशी होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

SCROLL FOR NEXT