OTT Release Film And Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Released This Week : ओटीटीवर मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी, 'इंडियन २', 'फिर आयी हसीन दिलरूबा'सह दमदार चित्रपट- वेबसीरीज रिलीज होणार

Chetan Bodke

ओटीटीवर प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे धाटणीच्या कलाकृती रिलीज होत असतात. कायमच प्रेक्षकांमध्ये त्या चित्रपटांची आणि वेबसीरिजची जोरदार चर्चा होते. प्रत्येक आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही ओटीटीवर थिएटरमध्ये रिलीज झालेले चित्रपटही रिलीज होणार आहेत.

शिवाय, अनेक वेब सीरिजही यावेळी रिलीज होणार आहेत. यामध्ये ॲक्शन, रोमँटिक, कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेबसीरिज रिलीज होणार (OTT Release This Week) आहे. ओटीटीच्या प्रेक्षकांसाठी ऑगस्ट महिना देखील खास असणार आहे. ओटीटीवर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात (5 ते 11 ऑगस्ट) प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.

Indian 2 Trailer

इंडियन 2 Indian 2

अभिनेते कमल हसन 'इंडियन २'मुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. चित्रपटाने थिएटरमध्ये दमदार कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंडियन' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज झाला आहे.

Phir Aayi Hasseen Dillruba Poster

फिर आयी हसीन दिलरुबा Phir Aayi Hasseen Dillruba

2021 मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाचा 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा सीक्वेल चित्रपट आहे. दोन्हीही चित्रपटाचे कथानक एकमेकांना जोडूनच आहे. पहिल्या चित्रपटाचे कथा जिथे संपली, तिथूनच दुसऱ्या चित्रपटाची सुरूवात होते. तापसी पन्नू स्टारर चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

Aapka Apna Zakir Poster

आपका अपना झाकिर Aapka Apna Zakir

सुप्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खानचा येत्या १० ऑगस्टपासून नवीन कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा शो चाहत्यांना सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. या शोच्या माध्यमातून कॉमेडियनने टीव्ही विश्वात एन्ट्री घेतली आहे. शोमध्ये प्रेक्षकांना त्याचे हजरजबाबी उत्तरं, त्याचे अतरंगी अनुभव, हास्याचे फवारे, शायरी आणि आयुष्यातील रंजक किस्से ऐकायला मिळणार आहेत.

Gyaarah Gyaarah Teaser

ग्यारह ग्यारह Gyaarah Gyaarah

करण जोहरच्या सस्पेन्स आणि फिक्शनल थ्रीलर असलेली 'ग्यारह ग्यारह' वेबसीरिज ९ ऑगस्टला ओटीटीवर रिलीज झालेली आहे. या वेबसीरिजचे कथानक 1990, 2001 आणि 2016 या कालावधीतलं आहे. ही वेबसीरिज Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Turbo Poster

टर्बो Turbo

टॉलिवूड सुपरस्टार मामुट्टी यांचा 'टर्बो' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. थिएटरमध्ये ७१ कोटींची भरघोस कमाई केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी 'सोनी लिव्ह'वर रिलीज होणार आहे.

Life Hill Gayi Poster

लाइफ हिल गई Life Hill Gayi

अभिनेता दिव्येंदू शर्मा कॉमेडी-ड्रामा असलेल्या 'लाइफ हिल गई' वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'लाइफ हिल गई' ही वेबसीरिज ९ ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney + Hotstar) प्रदर्शित होणार आहे.

Ghudchadi Poster

घुडचढी Ghudchadi

संजय दत्त आणि रवीना टंडन स्टारर रोमँटिक कॉमेडी 'घुडचढी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'जिओ सिनेमा' ह्या OTT प्लॅटफॉर्मवर ९ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT