Oscars Awards 2023 Saam TV
मनोरंजन बातम्या

Oscars Awards 2023: कधी, केव्हा आणि कुठे पहाल ऑस्कर पुरस्कार सोहळा, जाणून घ्या सविस्तर

भारतात ऑस्करचे थेट प्रक्षेपण 13 मार्च रोजी सकाळी 5:30 वाजता पाहता येणार.

Saam Tv

Oscars Awards 2023 Update: ऑस्कर 2023 किंवा 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या व्हेतील येणार आहे. १२ मार्च रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय चित्रपट 'RRR' ला ऑस्कर 2023 मध्ये 'सर्वोत्कृष्ट मूळ गाणे' श्रेणीत नामांकन मिळाले आहे. हा कार्यक्रम लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार भारतात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 13 मार्च रोजी सकाळी 5:30 वाजता Disney+Hotstar वर पाहता येणार आहे.

ऑस्कर 2023 चे थेट प्रक्षेपण ABC नेटवर्कवर देखील पाहिले जाऊ शकते, जे YouTube, Direct TV, FUBOTV आणि Hulu Live TV यासह विविध प्लॅटफॉर्मवर सदस्य असलेल्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

यावेळी भारतीय, ऑस्कर २०२३ ची खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कारण SS राजामौली दिग्दर्शित RRR ला या चित्रपटाला "सर्वोत्कृष्ट मूळ गाणे" श्रेणीसाठी ऑस्करमध्ये नामांकन मिळाले आहे. RRR च्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला श्रेणीत नामांकन मिळाले आहे. ‘नाटू नाटू’ला संगीत एम एम कीरावानी यांनी दिले आहे.

"टॉप गन मॅव्हरिक"मधील "होल्ड माय हँड", "टेल इट लाइक अ वुमन" मधील "Applause", "एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स" मधील "दिस इज ए लाइफ" आणि "लिफ्ट मी अप" "ब्लॅक पँथर वाकांडा फॉरेव्हर" या गाण्यांचं या श्रेणीतील नामांकनामध्ये समावेश आहे.

पुरस्कार समारंभात, दीपिका पदुकोण ऑस्कर 2023 मधील प्रस्तुतकर्त्यांपैकी एक असेल. ड्वेन जॉन्सन, झो साल्डाना, जेनिफर कोनेली, रिझ अहमद, एमिली ब्लंट, सॅम्युअल एल जॅक्सन, मायकेल बी जॉर्डन, मेलिसा मॅककार्थी आणि जेनेल मोने हे देखील ऑस्कर 2023 मध्ये पुरस्कार सादर करणार आहेत.

अमेरिकन अभिनेता आणि कॉमेडियन जिमी किमेल 2023 मध्ये ऑस्कर सोहळ्याचे आयोजन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार; बडा नेता ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार

धोकादायक पाच मजली इमारत पाडली, प्रकरण काय? पाहा व्हिडिओ

Mukesh Ambani: मोठी बातमी! मुकेश अंबानींना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाची धमकी

Maharashtra Live News Update: रायगडमधील ध्वजारोहण आदित्य तटकरेंच्या हस्ते होणार

Nashik News: शिंदे गटाच्या बैठकीत तुफान राडा, पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडत शिवीगाळ; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT