Twinkle Khanna Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Twinkle Khanna Birthday: अक्षय कुमारने खास अंदाजात दिल्या बायकोला शुभेच्छा, VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

Akshay Kumar Shared Twinkle Khanna Funny Video : आज ट्विंकल खन्नाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने तिला शुभेच्या देण्यासाठी एक खास मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

Shreya Maskar

अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आज 51 वर्षांची झाली आहे. वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बायकोच्या वाढदिवसाला अक्षय कुमार (Akshay Kumar ) एका हटके स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने ट्विंकल खन्नासाठी इंस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.

अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना पुस्तक वाचताना पाहायला मिळत आहे. मात्र व्हिडीओच्या दुसऱ्या भागात ती मनसोक्त नाचताना दिसत आहे. ट्विंकल खन्नाला डान्स करायला खूप आवडतो. असे या व्हिडीओतून दिसत आहे. या भन्नाट व्हिडीओला "ओ टीना " हे गाणे लावले आहे.

अक्षय कुमारने व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा टीना...मी तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे...पोट दुखेपर्यंत कसे हसायचे...माझ्या हसण्या मागचे कारण तूच असते...रेडिओवर आवडते गाणे वाजते तेव्हा माझे मन मनसोक्त नाचते...तेरे वर्गा सच में होर कोई ना..." अक्षयच्या या पोस्टवर ट्विंकल खन्नासाठी शुभेच्छांचा कलाकार आणि चाहत्यांकडून वर्षाव होत आहे.

ट्विंकल खन्ना ही सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. ट्विंकल खन्नाने काही चित्रपटात काम केले आहे. ती एक यशस्वी लेखिका आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने 2001मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना आरव आणि नितारा अशी दोन मुलं आहेत. ट्विंकल खन्ना सध्या अभिनयापासून दूर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT