Onkar Bhojne SaamTv
मनोरंजन बातम्या

Onkar Bhojne: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेचा नवा चित्रपट चर्चेत ; साकारणार मुख्य भूमिका

लवकरच कॉमेडी किंग ओंकार भोजने मोठ्या पडद्यावर मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टेलिव्हिजनवर आपल्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी वेगवेगळ्या पद्धतीने, आपल्या खुमासदार शैलीने चाहत्यांना खळखळून हासवणारा, 'कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काय पण', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदवीर म्हणजे ओंकार भोजने (Onkar Bhojane). तसेच ओंकारने विनोदी कार्यक्रमासोबतच चित्रपटांमध्येही आपल्या विनोदाची मोहोर उमटवली आहे 'बॉईज २', 'गर्ल्स', 'बॉईज ३' या चित्रपटात त्याने विनोदी भूमिका साकारली आहे. ओंकारचा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील 'अगं अगं आई', 'बाबा ओरडू ओरडू', 'मला घाबरु घाबरु' या संवादाने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली आहे.

लवकरच कॉमेडी किंग ओंकार भोजने मोठ्या पडद्यावर मनोरंजन (Entertainment) करण्यासाठी येत आहे. सानवी प्रॉडक्शन निर्मीत एका बिग बजेट चित्रपटात ओंकार मुख्य भूमिका साकारणार आहे. त्या निमित्ताने ओंकार पहिल्यांदाच एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकतेच चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील काही चित्रीकरण पार पडले असून या आगामी चित्रपटात ओंकार सोबत मराठीतील दिग्गज कलाकार असणार आहेत. लेखक, दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे. आरती चव्हाण यांची निर्मित या आगामी बिग बजेट मराठी चित्रपटाचे नाव, तसेच ओंकार भोजनेसोबत कोणती नायिका झळकणार याची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

आपल्या भूमिकेबद्दल ओंकार भोजने सांगतो की, 'मी आजवर टीव्ही किंवा चित्रपटात साकारलेल्या भूमिकांपेक्षा हे पात्र एकदम वेगळे होते. यासोबतच मी एका गोड आणि चांगल्या अभिनेत्रीचा हिरो बनतोय याचा आनंद आहे. या चित्रपटाचा नायक ज्या वयाचा आणि ज्या भावनिक विश्वात आहे, त्याच अवस्थेत मी आहे, हे मला चित्रपटाचे नरेशन सुरू झाले तेव्हाच जाणवले. यामुळे मी ठरवले की, नितीन सर सांगतील तेवढे करायचे. कारण त्यांच्या नजरेत संपूर्ण व्यक्तिरेखा होती. हे पात्र दिग्दर्शकाला जसे हवे होते, तसेच साकारण्यासाठी मला संपूर्ण टीमची मदत झाली. मी एकांकिका करताना जशी एनर्जी वापरायचो तशीच एनर्जी मला या सेटवर जाणवली यामुळे काम करताना खूप वेगळी एनर्जी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

SCROLL FOR NEXT