Akshay Kumar's New Vegan Diet Plan Saam TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar Fitness News: मांसाहारावर ताव मारणाऱ्या अक्षयने का सोडले चिकन- मटण?, मुलाखतीत सांगितला शाकाहारी होण्याचं कारण

Akshay Kumar Quit Eating Non-Veg: अक्षयने आपल्या फिटनेससाठी नेमकं नॉनव्हेज का सोडलं?, त्याच्या आयुष्यात असा कोणता किस्सा घडला, त्यामुळे त्याने नॉनव्हेज सोडलं. चला तर जाणून घेऊया, त्यामागील कारण

Chetan Bodke

Akshay Kumar's New Vegan Diet Plan: बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच आपल्या फिटनेससाठी चर्चेत राहतात. सेलिब्रिटी अनेकदा सोशल मीडियावर आपला डाएट प्लॅन देखील शेअर करत असतात. काही सेलिब्रिटींना नॉनव्हेज देखील खूप आवडतं. तर, काही जण आपल्या फिटनेससाठी नॉनव्हेज खाणं बंद करतात.

आपल्या फिटनेससाठी अनेक सेलिब्रिटींनी थेट मांसाहारच सोडलंय. यामध्ये आता अक्षय कुमारचा समावेश झाला आहे. अक्षयने आपल्या फिटनेससाठी चिकन- मटन सोडलंय. त्याने नेमकं नॉनव्हेज का सोडलं?, त्याच्या आयुष्यात असा कोणता किस्सा घडला, त्यामुळे त्याने नॉनव्हेज सोडलं. चला तर जाणून घेऊया, त्यामागील नेमकं कारण

एकेकाळी, चिकन- मटण म्हटल्यावर त्यावर ताव मारणाऱ्या अक्षय कुमारने नॉनव्हेज खाणे का बंद केले, असा सवाल अनेकदा त्याला चाहत्यांनी विचारला. त्याच्या आयुष्यात आलेल्या एका प्रसंगानंतर अक्षयने नॉनव्हेज खाणं सोडलं. मांसाहार करू नको, असा सल्ला खुद्द त्याच्या आईनेच त्याला दिलाय. अभिनेत्याच्या व्यावसायिक जीवनातील अनेक निर्णय त्याची आई घेते, तो कोणत्या चित्रपटात भूमिका साकारणार याचा निर्णय देखील त्याची आईच घेते. जेव्हा अक्षयची आई, अरूणा यांना कळलं की, ‘ओ माय गॉड’मध्ये अक्षय कृष्णाची भूमिका साकारतोय, तेव्हा त्याला मांसाहार करू नकोस असा सल्ला दिला होता.

अक्षयला त्याची आई म्हणाली, “तुझ्या चित्रपटाचं शूटिंग जो पर्यंत पूर्ण होत नाही, तो पर्यंत तू नॉनव्हेज खाऊ नकोस. कारण तू देवाचे पात्र साकारणार आहेस.” आईने दिलेला सल्ला अक्षयला आवडला, आणि त्याने शूटिंग पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाललं नव्हतं. सिनेमा प्रदर्शित झाला तरी त्याने नॉनव्हेजचा त्याग केला. नॉनव्हेज खाणं बंद केलं तरी, पुन्हा त्याची नॉनव्हेज खाण्याची इच्छाच झाली नाही. अक्षय कुमारने ‘ओ माय गॉड’नंतर नॉनव्हेज खाणं कायमचंच बंद केलं.

अक्षयचा हा ‘ओ माय गॉड’चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा नास्तिक कांजीलाल मेहता भोवती फिरत होती. पण चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अर्थात ‘ओ माय गॉड २’मध्ये पंकज त्रिपाठीची शंकरावर असलेली निस्सिम भक्ती दिसणार आहे. पंकज त्रिपाठीने कांती शरण मुदगल हे पात्र साकारलेय. अमित राय दिग्दर्शित ‘ओह माय गॉड २’ चित्रपट येत्या १ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अक्षयचे गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच फ्लॉप ठरले. त्याच्यासाठी ‘ओ माय गॉड २’ हा आगामी चित्रपट चांगलाच महत्वाचा ठरणार आहे. मंगळवारी त्याच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांचे मन जिंकले. सध्या खिलाडी कुमारच्या ‘ओ माय गॉड २’ची तुफान चर्चा सुरू आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमारसह, पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्या देखील दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT