Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : "जिथं Loyalty तिथं निक्की..." ग्रँड सेलिब्रेशननंतर निक्की-अभिजीतमध्ये रंगली चर्चा

Nikki - Abhijeet : 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड सेलिब्रेशननंतर निक्की आणि अभिजीत चर्चा करताना पाहायला मिळाले आहे. ते नेमकं काय बोलतात जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' च्या (Bigg Boss Marathi) घरात नुकतेच ग्रँड सेलिब्रेशन पार पडले आहे. आपला आजवरचा प्रवास पाहून सर्वांचे डोळे पाणावले आहेत. ग्रँड सेलिब्रेशननंतर जान्हवी किल्लेकर आपल्याला भावुक झालेली पाहायला मिळाली. ती येऊन अभिजीतला मिठी मारते. तर दुसरीकडे निक्की आणि अभिजीतमध्ये ग्रँड सेलिब्रेशनंतर चांगलीच चर्चा रंगलेली.

ग्रँड सेलिब्रेशननंतर निक्की आणि अभिजीत यांच्यात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. "आपल्या मोठ्या नावाचा इतरांनी वापर केला" असे म्हणताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता निक्की अभिजीतला (Abhijeet sawant) म्हणते की, "जिथे प्रामाणिकपणा असेल तिथे निक्की तांबोळी असं वाक्य माझ्यासाठी वापरण्यात आले. कारण मी माझ्या ग्रुपसोबत आधीपासूनच निष्ठावान राहिले. मी घनःश्यामसाठी, जान्हवीसाठी माझ्या ग्रुपचे जे सुरुवातीपासून माझ्याबरोबर होते. त्यांच्यासोबत निष्ठावान होते. मला हे सर्व चक्रव्ह्यूमध्ये दाखवण्यात आले."

निक्की (Nikki Tamboli ) पुढे अभिजीतला म्हणते की, "अंकिता, डीपी हे सर्व ग्रुप करुन मला बोलायचे. पहिल्या दिवसापासून तुझ्या आणि माझ्याविरुद्ध सगळं घर होतं. ग्रुप हा फक्त दिखाव्यासाठी होता. आपली नावं मोठी आहेत म्हणून आपला वापर करून घेतला. त्यावर अभिजीत म्हणतो की, अशीच 'टीम बी' देखील आहे."

बिग बॉस मराठीचा हा शेवटचा आठवडा खूप गाजत आहे. अनेक कलाकारांनी घरात येऊन स्पर्धकांशी संवाद साधला आणि त्यांना सरप्राईज देखील दिलं. आता बिग बॉस मराठी' च्या घरातून कोण बाहेर जाणार आणि बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT