Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : हा थर्ड क्लास शो बघणं बंद..., आर्याला घराबाहेर काढताच रितेश देशमुखवर संतपाले प्रेक्षक

Riteish Deshmukh : बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढण्याच्या निर्णयावर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. बिग बॉस आणि रितेश देशमुख यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Shreya Maskar

सध्या बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 5) घरातील वातावरण बिघडलेले पाहायला मिळत आहे. या आठवड्यात आर्याने निक्कीच्या थोबाडीत मारून नवीन वादाला सुरूवात केली. या वादाने आता वेगळच वळण घेतलेले पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सीमध्ये आर्या Aarya Jadhav) निक्कीच्या ( Nikki Tamboli ) कानाखाली मारते आणि घरात हिंसा केल्यामुळे तिला बिग बॉस जेलमध्ये टाकतात. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आर्याचा क्लास लावतो. तसेच या सर्वामुळे बिग बॉसने आर्याची घरातून हकालपट्टी केली आहे. मात्र या निर्णयाने बिग बॉसचे प्रेक्षक आणि आर्याचे चाहते नाराज आहेत. त्यांनी बिग बॉस आणि रितेश देशमुख यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्या कमेंट्समधून बिग बॉस प्रेमीं तीव्र रोष व्यक्त करत आहेत. आर्याने झालेल्या चुकीबद्दल माफी देखील मागितली आहे. घरात हिंसा खपवून घेतली जाणार नाही यामुळे आर्याला घराबाहेर काढण्यात आले. प्रेक्षक कमेंट्समधून संताप आणि नाराजी व्यक्त करत आहे. एका युजरने कमेंट केली की, महाराष्ट्र आता वेळ आली आहे... जनतेची ताकद दाखवायची... बिग बॉस बघणं बंद करा. तसेच दुसरे बोलतात की, निक्की -अरबाजला ट्रॉफी द्या आणि बाकी लोकांना बाहेर काढा एवढंच राहिल आहे आता...आजपासून हा थर्ड क्लास शो बघणं बंद...अशा संतापजनक शब्दात नेटकरी कमेंट्स करत आहेत.

नेटकऱ्यांनी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांवरही टीका केली आहे. "बायस बिग बॉस बायस होस्ट" असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे. आर्याला बाहेर काढल्यामुळे रितेश भाऊवरही प्रेक्षक नाराज आहेत. एका नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे की, अरबाज ने अभिजीत जोरात ढकलले ते योग्य होत का? तेथे बिग बॉसचा रुल ब्रेक नाही झाला का? ती हिंसा नव्हे? इतका बायस खेळ? तसेच दुसरा प्रेक्षक बोलतो की, भाऊचा धक्का आज चुकीचा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: फ्रिझी केसांना करा सॉफ्ट आणि स्मूद, रोज रात्री लावा हा खास हेअर स्प्रे

RCB vs GT IPL 2026 Final: गुजरातला पहिला धक्का; कर्णधार शुबमन गिल झेलबाद, २२ धावांवर गमावली पहिली विकेट

विधानपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग; अहिल्यानगरमधून शरद पवार गटाचा तगडा उमेदवार रिंगणात उतरणार

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर पावसाला सुरुवात

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांना पुन्हा १५०० रुपये मिळणार? सुप्रिया सुळेंची फडणवीस सराकारकडे मोठी मागणी

SCROLL FOR NEXT