Neha Sharma Trolled For Revealing Dress Instagram
मनोरंजन बातम्या

Neha Sharma Trolled: ‘विचित्र ड्रेस घालून इतका कॉन्फिडन्स येतो कुठून?’ नेहा शर्माला नेटकऱ्यांचा सवाल

सध्या नेहा शर्माचा एका फॅशन इव्हेंटमधील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला बऱ्याच प्रमाणात ट्रोल करत आहे.

Chetan Bodke

Neha Sharma Trolled For Revealing Dress: सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ करणारी नेहा शर्मा नेहमीच चर्चेत असते. नेहा शर्माने अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत कातिल करणाऱ्या अंदाजात फोटो शेअर केले होते, त्यामुळे तिच्यासाठी ट्रोलिंग काही नवं नाही. सध्या नेहा शर्माचा एका फॅशन इव्हेंटमधील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला बऱ्याच प्रमाणात ट्रोल करत आहे. (Bollywood)

नेहानं या फॅशन इव्हेंटमध्ये घातलेला ड्रेस अनेकांना आवडलेला नाही. मुख्य बाब म्हणजे, तिने लेहेंग्यावर जो ब्लाऊज घातला आहे, ते नेटकऱ्यांना खटकलं आहे. नेहानं घातलेला हा ब्लाऊज केवळ एका हूकावर बॅलन्स करुन शिवला गेला असून नेटकऱ्यांनी हे पाहून तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. नेहासाठी ट्रोलिंग काही नवीन नाही. विचित्र फॅशन करत नेहाला नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव ही केला आहे, तर तिला ट्रोल देखील केलं आहे. (Fashion)

फॅशन वीक २०२३ मध्ये नेहाने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तिने गोल्डन यलो रंगाच्या लेहेंग्यात रॅम्प वॉक करत सर्वांच्याच नजरा आपल्याकडे वेधले. ट्रोलिंग आणि कौतुक होत असलेल्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. नेहाचा हा लूक फिल्मीग्यान या सोशल मीडिया अकाऊंटने शेअर केला आहे. नेहाच्या या लूकवर नेटकऱ्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. (Bollywood Actress)

नेटकरी म्हणतात, “हा ड्रेस किती सहज घालून फिरते ही बाई, हिला ना लाज..., ना शरम..., इतका कॉन्फिडन्स तुला येतो कुठून?”, तर पुढील नेटकरी म्हणतो, “तू बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींची कॉपी करायला जाऊ नको.”, तर आणखी एक म्हणतो, “हे लोक समाजासाठी आदर्श असतात ना? आणि जर हेच आजच्या तरूणांसमोर असे कपडे घालून वावरायला लागले तर कसं होईल.” (Marathi News)

बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने काम करत आपली ओळख प्रस्थापित केली आहे. (Bollywood Film)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips For Car: नवीन गाडीची पूजा बायकोकडून का करावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार फायदे

Chapati Side Effects: रात्री चपाती खाल्ल्याने उद्भवतात 'या' समस्या, वेळीच घ्या काळजी

Fish : बुद्धिमान आणि सुंदर असतो हा पाण्यातील मासा, ९९% लोकांना नसेल माहिती

Shivsena: '५० खोक्यांमधील आज १ खोका दिसला' संजय शिरसाटांच्या बेडवरूममधील व्हिडिओवर शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

SCROLL FOR NEXT