Neha Marda Baby Naming Ceremony  Instagram @nehamarda
मनोरंजन बातम्या

Neha Marda Baby Naming Ceremony: बालिका वधू फेम अभिनेत्रीच्या मुलीचं बारसं ; रॉयल सोहळ्याचा व्हिडिओ केला शेअर

Neha Marda : नेहा मर्दाने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Neha Marda Share Video: प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'बालिका वधू' फेम अभिनेत्री नेहा मर्दा काही काळापूर्वी आई झाली आहे. नेहा मुलीच्या जन्मावर खूप आनंदी आहे.

नेहा आणि तिच्या पतीचे आई-वडील होण्याचे स्वप्न 10 वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. त्यामुळे दोघेही खूप आनंदी आहेत. नेहाने तिच्या पतीसोबत बाळाचं नाव ठेवलं आहे. यादरम्यान या दोघांनी मुलीच्या बारश्याची जय्यत पार्टीही दिली. (Latest Entertainment News)

नेहा मर्दाने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा पती आयुष्मान अग्रवालसोबत दिसत आहे. यावेळी आयुष्मान आणि नेहा खूप आनंदी दिसत आहेत.

नेहाच्या मुलीच्या बारश्यासाठी अप्रतिम सजावट केली आहे. नेहाच्या मुलीचे बारसे झाल्यानंतर केक कटिंगही करण्यात आले. नेहा आणि आयुष्मानने कुटुंबासह त्यांच्या मुलीसाठी केक कटिंग केले.

नेहाने तिच्या मुलीला लाईट पिंक रंगाचा फ्रॉक घातला होता, ज्यामध्ये ती एखाद्या परीसारखी दिसत होती. तर नेहा स्वतः राजस्थानी लूकमध्ये दिसली. नेहाने तिच्या लूकचा देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नेहा मर्दाने आणि तिचा पती आयुष्यमान अग्रवाल यांनी त्यांच्या मुलीचे नाव अनाया असे ठेवले आहे.

नेहा मर्दा टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे. सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार जिंकला आहे. नेहाने 'बालिका वधू', 'डोली अरमानो की', 'क्यों रिश्तों में कट्टी बत्ती', 'पिया अलबेला' आणि 'साथ रहेगा ऑलवेज' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. (TV Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या दिग्गज महिला नेत्याचे निधन; महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा

Excess oil in curry: भाजीमध्ये तेल जास्त झालंय? या सोप्या ट्रिक्सने कमी करा

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख 62 हजार मतदारांचा शोध लागेना

Emraan Hashmi : इमरान हाश्मीला डबल लॉटरी! 'आवारापन २' चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर अन् 'जन्नत ३' येणार? निर्मात्यांनी दिली हिंट

Gadchiroli Fort : भक्कम तटबंदी अन् विशाल जलाशय, गडचिरोलीच्या घनदाट जंगलात लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

SCROLL FOR NEXT