Neha Kakkar News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neha Kakkar: नेहा कक्कर सोबत घटस्फोट घेणार? पहिल्यांदाच व्यक्त झाला रोहनप्रीत सिंह, म्हणाला ...

Neha Kakkar: नेहा कक्कर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली. नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत सिंह यांच्याविषयी घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या.

Manasvi Choudhary

गायिका नेहा कक्कर हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. नेहाने तिच्या सुमधूर संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. नेहा कक्कर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. कुटुंबियासोबतचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करते. अलिकडेच नेहा कक्कर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली. नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत सिंह यांच्याविषयी घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या.

मागील काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या नात्यात सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. अलिकडेच नेहाचा वाढदिवस झाला तेव्हा तिचे मित्र आणि केवळ परिवारच दिसला. तर पती रोहनप्रीत हा दिसला नसल्याने सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. नेहा आणि रोहनप्रीत लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच आता नेहाचा पती रोहनप्रीत सिंहने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

रोहनप्रीतने पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये रोहनप्रीत सिंह म्हणाला, "फवा या फक्त अफवा असतात. त्या खऱ्या नसतात. उद्या कोणीही काहीह बोलेल, परवा कोणी आणखी काही बोलेल. मात्र याचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ देऊ नका."

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह २४ ऑक्टोबर २०२० मध्ये लग्नबंधनात अडकले. यांच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह हे दोघेंही आनंदी आयुष्य जगत आहे. त्याच्यामध्ये कोणताही वाद नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT