Nawazuddin Siddiqui On Multiplex Ticket Prise Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui On Multiplex Ticket: नवाजुद्दिनचं मल्टिप्लेक्समधील तिकीट दरावर महत्वाचं भाष्य, थेट सरकारलाच दिला कानमंत्र

Nawazuddin Siddiqui News: मल्टिप्लेक्सच्या तिकीटांची किंमत भरमसाठ वाढली असून नवाजुद्दीनने त्यावर चिंता व्यक्त केली आहे.

Chetan Bodke

Nawazuddin Siddiqui On Multiplex Ticket Prise: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांनी चित्रपटाला दिलासादायक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मल्टिप्लेक्सच्या तिकीटांची किंमत भरमसाठ वाढली असून नवाजुद्दीनने त्यावर चिंता व्यक्त केली आहे. जर तिकीटांच्या किंमतींमध्ये किंमत कमी केली तर, त्याचा फायदा नक्कीच प्रेक्षकांना होईल असा त्याने विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी नवाजुद्दिनने एएनआय या वृत्तसंस्थेसोबत संवाद साधताना म्हणाला, “उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये चित्रपटांना आर्थिक मदत केली जाते. इथे चित्रपटांना अनुदान दिले जाते, ही खूप मोठी गोष्ट आहे. मल्टिप्लेक्समध्ये तिकीटांची किंमत जास्त असल्याने प्रेक्षक तिथे पाठ फिरवत आहेत.”

“मल्टिप्लेक्समधील तिकिटांच्या किमतींकडे जर सरकारने लक्ष दिले तर, सर्वाधिक प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येतील.” यादरम्यान अभिनेत्याला प्रश्न विचारण्यात आला की, ‘उद्या पंतप्रधान नवीन संसदेचे उद्घाटन करणार आहेत, तुम्हाला संसदेत बोलवले तर जायला आवडेल का?’ यावर नवाजुद्दिन सिद्दीकी म्हणतो, ‘नक्कीच! बोलावले तर मी उपस्थित राहीन.’

कुशान नंदी दिग्दर्शित ‘जोगिरा सारा रा रा’ हा चित्रपट २६ मे ला प्रदर्शित झाला. चित्रपटात प्रमुख भूमिकेत नवाजुद्दिन सिद्दीकीशिवाय नेहा शर्मा, महाक्षय चक्रवर्ती, संजय मिश्रा, जरीना वहाब आणि फारुख जफर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जवळपास 40 लाख रुपयांचा व्यवसाय केला असून नवाजुद्दिनचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटाची निर्मिती कंगना रनौत करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Protest: ऐन दिवाळीत शेतकरी रस्त्यावर, पुणे-बंगळूरू महामार्गावर रास्तारोको; उसाला 4500 रुपयांचा दर देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना 5 लाखांचा दंड, BMC आयुक्तांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Bank Election: जिल्हा बँकांची तिजोरी कुणाकडे? साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा बदला घेणार?

Vastu Tips for Shoes and Footwear: घराच्या दारासमोर चप्पल-बूट ठेवावे की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम!

सत्तेतला पक्ष, पण कामांचा पत्ता नाही? वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला? देवगिरीवरील बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT