Nawazuddin Siddiqui maid video saam tv
मनोरंजन बातम्या

Nawazuddin Siddiqui वर पत्नीनंतर मोलकरणीने केले धक्कादायक आरोप! रडतानाचा व्हिडिओ व्हायरल

Nawazuddin Siddiqui : काही दिवसांपूर्वी नवजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर आणि त्याच्या आईवर अनेक गंभीर आरोप केले होते.

Chandrakant Jagtap

Nawazuddin Siddiqui maid video: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नवजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर आणि त्याच्या आईवर अनेक आरोप केले होते.

आता त्याच्या घरातील मोलकरणीनेही नवाजुद्दीन सिद्दीकीवर अनेक आरोप केले आहेत. नवाजुद्धीच्या घरी काम करणाऱ्या महिलेचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात ती नवाजुद्दीन तिला दुबईत सोडून गेल्याचा आरोप करताना दिसत आहे. ही मोलकरीण या व्हिडिओत रडताना दिसत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरातील मोलकरण सपना रॉबिन मसिहने त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. अभिनेत्याची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवानने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नवाजुद्दीनमुळे दुबईत अडकल्याचे सांगत आहे. व्हिसा फीचे कारण सांगून तिला पगार देखील दिला जात नसल्याचा आरोप मोलकरणीने केला आहे.

दरम्यान नवाजुद्दीनची पत्नी आलियाच्या वकिलाने म्हटले की, सरकारी रेकॉर्डनुसार सपनाची एका अज्ञात कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ती नवाजुद्दीनच्या दुबईत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलांची काळजी घेत होती. सपनाने सांगितले की नवाजुद्दीनने तिला दुबईत अन्न आणि पैशाविना सोडून दिले आहे. (Entertainment News)

आलियाच्या वकिलानेही केले धक्कादायक खुलासे

दरम्यान आलियाच्या वकिलानेही यापूर्वी नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची आई त्याची पत्नी आलियाचा छळ करत आहे. नवाजुद्दीन किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही आलियाला 7 दिवस जेवण दिले नाही. ते तिला झोपायला बेड देत नाहीत. आलियाला आंघोळीसाठी बाथरूममध्येही जाण्याची परवानगी नाही. एवढेच नाही तर त्यांनी तिच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत. तिच्या खोलीबाहेर बॉडीगार्ड २४ तास तैनात असतात', असे गंभीर आरोप आलियाच्या वकिलाने नवाजुद्दीनवर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT