Navra Majha Navsacha 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navra Majha Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट; तीन दिवसात जमवला तब्बल 'इतक्या' कोटींचा गल्ला

Manasvi Choudhary

'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचं नाव जरी घेतलं तरी प्रेक्षक २००५ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाच्या आठवणीत रमतात. आजही चित्रपटातील गाणी, डायलॉग प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. नुकताच "नवरा माझा नवसाचा" सिक्वेल प्रदर्शित झाला आहे. हा देखील चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाची कथा, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळतेय.

'नवरा माझा नवसाचा 2' हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला. एकूण १००० हजारांपेक्षा अधिक सिनेमागृहात हा चित्रपट रिलीज झाला आहे. नुकताच रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटींच्या आसपास कमाई केली होती.

'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.चित्रपट रिलीज झाल्यानंतर विकेंड आल्याने चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी मोठ्या प्रमाणात दिसली. केवळ तीन दिवसांतच या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.85 कोटी रूपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली, चित्रपटाने २.५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘नवरा माझा नवसाचा २’ ने ३.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाची तीन दिवसांची कमाई ८.२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण पुरस्कृत अशोक सराफ, अभिनेता स्वप्नील जोशी. सिद्धार्थ जाधव या कलाकार मंडळीनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरपणातील आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण? वाचा

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौरा

konkan : मनाला वेड लावणारे सौंदर्य, कोकणातील 'हा' समुद्रकिनारा पाहिलात का?

Akshay Shinde: अक्षय शिंदेची आत्महत्या नाही एन्काऊंटर, सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांचा गोळीबार; नेमकं काय घडलं? वाचा...

रस्त्यांना नदीचे स्वरूप; चारचाकी अडकली, दुचाकी गेली वाहून; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT