मनोरंजन बातम्या

Satyaprem Ki Katha New Song Released: 'सत्यप्रेम की कथा' मधील 'नसीब से' गाणे प्रदर्शित; कार्तिक - कियाराचा पुन्हा दिसला रॉमँटिक अंदाज

Naseeb Se Song Released: 'नसीब से' हे गाणे पायल देव आणि विशाल मिश्रा यांनी गायले आहे.

Pooja Dange

Kartik Aaryan - Kiara Advani Romantic Song: बॉलिवूडचा शेहजादा कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कियारा आणि कार्तिक यांची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. नुकतेच या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे.

कार्तिक काल पोस्ट करत आज गाणे प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. 'नसीब से' असे या गाण्याचे बोल आहेत.

'नसीब से' हे गाणे पायल देव आणि विशाल मिश्रा यांनी गायले असून पायल देवाने संगीतबद्ध केले आहे.

'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातील 'नसीब से' हे गाणे काश्मिरमध्ये चित्रित झाल्याचे दिसत आहे. गाण्याची सुरुवात झाल्यानंतर कार्तिक आणि कियारा बाईकवर दिसत आहेत. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ही जोडी दाखविण्यात आली आहे. कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज आपल्याला या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

काल या चित्रपटातील एक व्हिडिओ लीक झाला होता. या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन साऊथ इंडिअन लूकमध्ये डान्स करत होता.

हा चित्रपट 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. कार्तिक आणि कियाराशिवाय या चित्रपटात गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी, बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'भूल भुलैया 2'मध्ये कार्तिक आणि कियारा यांची जोडी दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card KYC: घरबसल्या करा रेशन कार्ड केवायसी; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'या' कंपनीची स्थापना, IAS अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

Buldhana Accident : केळीने भरलेला ट्रक पलटी; दोन मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर

'The Bads Of Bollywood' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला एकामागोमाग एक चित्रपटांची लॉटरी, जान्हवी कपूरसोबत झळकणार?

SCROLL FOR NEXT