आज नाना पाटेकरांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन
अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत हळहळ
कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली
आज सकाळी (८ ऑक्टोबर २०२६) मनोरंजन विश्वातून दुःखत बातमी समोर आली. अभिनयाचा बादशहा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गोव्यात हदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मनोरंजन विश्वातील तेजस्वी तारा हरपला.
नानांच्या निधनाने अभिनय सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकरांच्या निधनानंतर अनेक कलाकारांशी साम टीव्हीने संपर्क साधला. नानांविषयी बोलताना कलाकार भावुक झाले. त्यांना रडू कोसळले. अनेकांनी नानांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नानांवर श्रद्धांजली वाहिली आहे.
भरत जाधव
"मला विश्वास बसत नाही...सर्वांची काळजी घेणारा होता माणूस" भरत जाधव नानांच्या निधनाने भावुक
"नानाजींच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. ते अशा काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फार काही करण्याची गरज भासत नसे. तो आवाज, ती तीव्रता आणि प्रत्येक अभिनयातील ती प्रामाणिकता... त्यांची शैली अगदीच अद्वितीय होती. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यांच्यासोबत 'वेलकम' आणि अलीकडेच 'हाऊसफुल ५' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या सेटवरील अनेक आठवणी माझ्यासाठी नेहमीच खास राहतील. नानाजी खरोखरच अद्वितीय होते. तुम्ही आता आमच्यात नाही आहात, यावर विश्वासच बसत नाहीये. त्या सर्व आठवणींसाठी धन्यवाद. तुमची खूप आठवण येईल, जी शब्दांत मांडणे कठीण आहे."
अशोक सराफ
साम टीव्हीशी बोलताना मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ भावुक झाले. "माझा जीवाभावाचा मित्र मी गमावला..." या शब्दात भावना व्यक्त केल्या.
निवेदिता सराफ
"ते कायम फिट होते...सकाळी अशी त्यांच्या निधनाची बातमी ही खूप दुःखद घटना आहे. चित्रपटसृष्टीतील फक्त हिरा नाही तर आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती गेली आहे. "
मोहन जोशी
"ही धक्कादायक घटना आहे...चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान आहे..."
किशोरी शहाणे
"सर्व आठवणी आठवल्या...त्याच्यासोबत काम करण्याची संधी एका चित्रपटात मिळाली होती..."
रितेश देशमुख
रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नानांसाठीचे प्रेम, आदर व्यक्त केला आहे. अभिनेता भावुक झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.