Surbhi Jyoti Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Surbhi Jyoti Wedding: 'कबुल है'ची जोया अडकणार विवाहबंधनात, कोण आहे सुरभी ज्योतीचा होणारा नवरा?

Qubool Hai Fame Actress Surbhi Jyoti: सुरभी ज्योती लवकरच अभिनेता सुमित सुरीसोबत(Sumit Suri) लग्न करणार आहे. सुरभी लग्न करणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Priya More

Surbhi Jyoti And Sumit Suri Wedding:

२०२३ मध्ये बॉलिवूड (Bollywood) आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली. आता २०२४ या वर्षात देखील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकणार आहे. या यादीमध्ये आता 'नागिन'आणि 'कबुल है' फेम अभिनेत्री सुरभी ज्योतीने (Surbhi Jyoti) देखील नंबर लावला आहे. सुरभी ज्योती लवकरच अभिनेता सुमित सुरीसोबत(Sumit Suri) लग्न करणार आहे. सुरभी लग्न करणार असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

2024 मध्ये सेलिब्रिटींच्या लग्नाला सुरूवात झाली आहे. नुकताच आमिर खानची मुलगी आयरा खानचे लग्न झाले. त्यानंतर अभिनेत्री रकुलप्रीत तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत लग्न करणार असल्याची माहिती समोर आली. आता 'कबूल है'मधील झोया अर्थात अभिनेत्री सुरभी ज्योतीच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. सुरभी ज्योती अभिनेता सुमित सुरीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, 'हे एक ग्रँड वेडिंग असेल आणि ते 6 किंवा 7 मार्चला होण्याची शक्यता आहे. सुरभीने लग्नाची तयारी सुरू केली आहे. हे पारंपारिक उत्तर भारतीय समारंभ असतील. ज्यात कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्रीने अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही कारण ती सध्या अमेरिकेत आहे.

सुरभीचा होणारा नवरा सुमित सूरीबद्दल सांगायचे झाले तर, 'द टेस्ट केस' आणि 'होम' यासारख्या ओटीटी शोमध्ये त्याने काम केले आहे. सुमितने सुरभी ज्योतीसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू होती. 2018 मध्ये जेव्हा त्याला सुरभीला डेट करण्याचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आणि एकमेकांना मित्र म्हणून टॅग केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT