Naga Chaitanya Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sobhita Dhulipala : लगीन घटिका समीप आली! शोभिताने शेअर केले 'पेल्ली कुथुरु' समारंभाचे फोटो

Naga Chaitanya - Sobhita Dhulipala Wedding : साउथ स्टार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शोभिताने लग्नाआधीच्या 'पेल्ली कुथुरु' समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.

Shreya Maskar

साउथ सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे. शोभिता आणि नागा चैतन्य यांचा शाही विवाह सोहळा 4 डिसेंबरला थाटामाटात पार पडणार आहे.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हैदराबाद येथे लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात झाली आहे. नुकताच शोभिताचा 'पेल्ली कुथुरु' समारंभ पार पडला आहे. शोभिताने या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पेल्ली कुथुरु समारंभ

'पेल्ली कुथुरु' (Pelli Kuthuru) तेलुगू संस्कृतीतील लग्नाआधीच्या विधी आहे. हा समारंभ लग्नाआधी मुलीकडे केला जातो. कारण मुलगी तिच्या नवीन आयुष्याला सुरूवात करणार असते. या समारंभातून तिला शुभेच्छा दिल्या जातात. या समारंभात हळदीचा मुख्य समावेश असतो.

शोभिता धुलिपालाने 'पेल्ली कुथुरु' समारंभासाठी पारंपारिक पोषाख केला होता. तिने लाल रंगाची गोल्डन काठ असलेली साडी नेसली होती. या साडीमध्ये शोभिताचे सौंदर्य खुललं होते. साडीला साजेल असे दागिने आणि मेकअप तिने केला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शोभिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुटुंब तिचे औक्षण करताना पाहायला मिळत आहे. 'पेल्ली कुथुरु' हा घरगुती पद्धतीने समारंभ पार पडला.

नागा चैतन्य

अभिनेता नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. नागा चैतन्यने या आधी दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी लग्नगाठ बांधली होती. मात्र काही काळातच हे दोघ विभक्त झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT