Mumbai Diaries 2 Trailer You Tube
मनोरंजन बातम्या

Mumbai Diaries 2 Trailer: २६ नोव्हेंबरच्या रात्री बॉम्बे हॉस्पिटमध्ये नेमकं काय घडलं?, अंगावर शहारा आणणारा ‘मुंबई डायरीज २’चा ट्रेलर प्रदर्शित

Mumbai Diaries 2 Trailer News: मेडिकल ड्रामा असलेल्या ‘मुंबई डायरीज २’ च्या ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Mumbai Diaries 2 Trailer Shared On Social Media

बहुचर्चित ‘मुंबई डायरीज’ या वेबसीरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ‘मुंबई डायरीज’च्या भरघोस यशानंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई डायरीजचा आगामी सीझन येतोय. याची गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. (Bollywood)

घोषणा केल्यानंतर सर्वांनाच या वेबसीरीजची प्रचंड उत्सुकता होती. अखेर या वेबसीरीजचा आज ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मेडिकल ड्रामा असलेल्या या वेबसीरिजच्या ट्रेलरमध्ये आपल्याला बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी कोणत्या नव्या आव्हानांना तोंड देणार हे आपल्याला ट्रेलरमधून कळेल. (OTT)

निखिल अडवाणी दिग्दर्शित या वेबसीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. आता दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना मुंबई शहराला नेस्तनाभूत करणाऱ्या विध्वंसक पुराची कथा पाहायला मिळणार आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातील काही समस्या नातेसंबंध आणि भवितव्य उद्ध्वस्त करणारे आहेत. त्या डॉक्टरांनी कशाप्रकारे सर्वस्वपणाला लावत लोकांचे प्राण वाचवले, हे या ट्रेलरमधून दिसत आहे. (Web Series)

मुंबई डायरीज २ मध्ये प्रमुख भूमिकेत, मोहित रैनासह कोंकणा सेन, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावाडी हे कलाकार दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती निखिल अडवाणी यांनी केली आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी ही वेबसीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT