Mukesh Khanna SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mukesh Khanna: 'त्या' सुपरस्टारला 'शक्तिमान'साठी केलं रिजेक्ट, मुकेश खन्ना म्हणाले दोन तास...

Ranveer Singh: 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंहला नकार दिला. नेमकं कारण काय जाणून घ्या.

Shreya Maskar

'शक्तीमान' ही 90च्या दशकातील शो सर्वांचा आवडता होता. लहान मुलं तर विशेषता 'शक्तीमान' पाहायचे. 'शक्तीमान'ने २००५ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र आजही 'शक्तीमान'चा(Shaktiman) मोठा चाहता वर्ग आहे. आजही लोक त्याचे जुने एपिसोड आवडीने पाहतात.

आता पुन्हा एकदा 'शक्तीमान' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शक्तीमान' चित्रपटाची मुकेश खन्ना यांनी घोषणा केली आहे. यामुळे चाहते खूप आनंदी पाहायला मिळत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शक्तीमानच्या भूमिकेसाठी बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह नुकताच मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्या कार्यालयात गेला होता. मात्र मुकेश खन्ना यांनी रणवीरला या भूमिकेसाठी नकार दिला. तब्बल २.५ तास रणवीर सिंग मुकेश खन्ना यांच्या ऑफीस बाहेर वाट पाहत होता.

अभिनेता मुकेश खन्नाने जेव्हा 'शक्तीमान' चित्रपटाची घोषणा केली तेव्हा रणवीर सिंग शक्तीमानच्या भूमिकेसाठी माझ्याकडे आला होता, असे सांगितले. मुकेश खन्ना यांनी रणवीरचे कौतुक देखील केले. ते म्हणाले की, "रणवीर (Ranveer Singh) हा उत्कृष्ट अभिनेता असून त्याच्याकडे सुपर एनर्जी देखील आहे. मात्र शक्तीमान कोण होणार हे मी निश्चित करणार कारण कास्टिंग निर्माता करतो...अभिनेता नाही." असे मुकेश खन्ना म्हणाले.

मुकेश खन्ना पुढे म्हणाले की," शक्तिमानची भूमिका करण्यासाठी फक्त स्टारडम असणे पुरेसे नाही तर तसा चेहराही असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे." रणवीर सिंह नुकताच 'सिंघम अगेन'मध्ये पाहायला मिळत आहे. यात त्यांनी आपल्या दमदार ॲक्शनने चाहत्यांना वेड लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT