Chahat Pandey Saam TV
मनोरंजन बातम्या

Chahat Pandey: अभिनयात पास पण राजकारणात नापास; 'आप'कडून निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्रीचा दारुण पराभव!

Madhya Pradesh Assembly Election Results: चाहतच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या आहेत. सध्या ते ३६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

Ruchika Jadhav

Madhya Pradesh:

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. अशात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता येणार अशी चिन्हे आहेत. विजय मिळावा यासाठी यावेळी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीत कंबर कसली होती. मात्र आपसह काँग्रेस निवडणुकीत मागे पडल्याचे दिसत आहे. अशात आप पक्षातर्फे विधानसभेसाठी उभी असलेली अभिनेत्री चाहत पांडेंला पराभव पत्करावा लागाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाहत पांडे पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभी राहिली होती. अभिनेत्री मध्य प्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाली आहे. या निवडणुकीत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. चाहतच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत मलाय्या आहेत. सध्या ते ३६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

पहिल्या क्रमांकावर जयंत मलाय्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अजय कुमार टंडन आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्रताप रोहित अहिरवार यांना तिसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे. अभिनेत्री चाहत पांडे मध्य प्रदेशातील दमोह येथील रहिवासी आहे. ती या वर्षी जूनमध्ये आम आदमी पार्टीमध्ये सामील झाली होती.

चाहत पांडेच्या अभिनयातील कामाबद्दल बोलायचे झाले तर, साल २०१६ मध्ये तिने 'पवित्र बंधन' या मालिकेद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती 'राधाकृष्ण' मालिकेत राधाच्या भूमिकेत झळकली होती. पुढे साल 2019 मध्ये 'हमरी बहू सिल्क'मध्ये ती दिसली. त्यानंतर अभिनेत्रीने 'दुर्गा माता की छाया' आणि 'नथ जेवर या जंजीर' या मालिकांमध्ये काम केले. अभिनयातील कामातून तिने प्रचंड पसंती मिळवली मात्र राजकारणात तिला हार पत्करावी लागलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT