माणसापेक्षा माकड हुशार! कसं ते सुबोध भावेने सांगितलं...पहा फोटो
माणसापेक्षा माकड हुशार! कसं ते सुबोध भावेने सांगितलं...पहा फोटो instagram/@subodhbhave
मनोरंजन बातम्या

माणसापेक्षा माकड हुशार! कसं ते सुबोध भावेने सांगितलं...पहा फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माणसाचे पुर्वज हे माकड आहेत असं आपण शाळेत शिकलो होतो. माणुस हा पृथ्वीवरचा सर्वाच बुद्धीमान प्राणी असला तरी अनेकदा माणसाकडून असे बेशिस्त वर्तन करण्यात येतं की, असं वाटतं की प्राणीतरी आपल्यापेक्षा जास्त शिस्तप्रिय आहेत. प्राणी हे निसर्गाच्या नियमांत राहुन आपलं जीवन जगत असताता. माणुस मात्र निसर्गाचेच काय तर स्वतःचेही नियम तोडतो. जे आपल्याला कळत नाही ते प्राण्यांना कळतं. कसं? ते सुबोध भावेने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरुन सांगितलं आहे. (Monkeys smarter than humans! How did Subodh Bhave say that ... see photo)

हे देखील पहा -

हजार शब्दांपेक्षा एक फोटो जास्त बोलका असतो हे वाक्य सुबोधने शेयर केलेल्या फोटोला तंतोतंत लागू होतं. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. ज्यात एक माकड बसलेलं दिसत असून त्या माकडानं तोंडाला चक्क मास्क घातलं आहे. कोरोना महामारीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क महत्वाचं हत्यार मानलं जातं. असं असतानाही अनेकजण बिनामास्क फिरत असातात. त्यामुळे सरकार मास्क घालण्यासाठी वारंवार आवाहन करत असते. मात्र तरीही अनेक लोकं नियम पाळत नाहीत. मात्र या माकडाला कोरोनाचं गांभीर्य कळलं असावं म्हणूनतर त्याने मास्क लावला आहे, तेही अगदी परफेक्ट. हाच फोटो शेयर करत सुबोधने लिहिलं की, ''यांनाही कळतं...'' या फोटोवरुन कधीतरी असं वाटतं की, खरंच माणसापेक्षा हे माकडच हुशार आहे.

सुबोध भावे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतो. त्याच्या कट्यार काळजात घुसली, बालगंधर्वसारख्या चित्रपटांतील भूमिकांनी तर त्याला विशेष प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून दिलं आहे. फक्त चित्रपटच नव्हे तर नाटक आणि मालिकांमध्येही सुबोधचं मोठं सहकार्य आहे. छोट्या पदड्यावरील अलीकडेच 'तुला पाहते रे' आणि 'चंद्र आहे साक्षीला' या मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. तो सध्या पडद्यावर झळकत नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.अनेकदा तो आपली भुमिका रोखठोकपणे मांडत असतो.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Serial TRP Ratings : ‘ठरलं तर मग’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये रंगली चुरस, झी मराठीवरील ‘पारू’ला प्रेक्षकांची पसंती

Today's Marathi News Live : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

MEA Advisory: नोकरीसाठी जाल अन् गुलामगिरीच्या जाळ्यात अडकाल! कंबोडियाला जाणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रायलाने जारी केली अ‍ॅडव्हायझरी

Effects of Aelovera: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास होतील गंभीर परिणाम

Yad Lagla Premacha: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मराठी बिग बॉस फेम अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार अनोखी भूमिका

SCROLL FOR NEXT