Monica, O My Darling Trailer Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Trailer Release: 'मोनिका, ओ माय डार्लिंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'मोनिका, ओ माय डार्लिंग' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Upcoming Films On Netflix: 'मोनिका, ओ माय डार्लिंग' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'मसान' चित्रपटाचे लेखक वरुण ग्रोवर यांनी केले.

आर.डी. बर्मन यांच्या सुप्रसिद्ध गाण्याने या ट्रेलरची सुरूवात झाली आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असून खून करण्यापासून ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंच्या सर्व घटना या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आल्या आहेत.

'मोनिका, ओ माय डार्लिंग' या चित्रपटामध्ये, हुमा कुरेशीचे पात्राचे गूढ दाखवले आहे. प्रत्येक शॉटनंतर हत्येचे रहस्य उलगडत आहे. कथेतील प्रत्येक पात्राकडे संशयाची सुई जात आहे. एक मृतदेह आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी निघालेली तीन माणसे, या रहस्याचे पुढे काय होणार? हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. (Movie)

राजकुमार राव, हुमा कुरेशी, सिकंदर खेर, आकांशा रंजन कपूर, या चित्रपटात दिसणार आहेत. 'सुपर डिलक्स' स्टार बागवती पेरुमल आणि सुकांत गोयल या चित्रपटाद्वारे हिंदीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात राधिका आपटे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. (Netflix)

वासन बाला दिग्दर्शित या चित्रपटाचे निरीक्षण थ्रिलर जॉनरचे आयकॉन श्रीराम राघवन यांनी केले आहे. त्यांनी 'अंधाधुन'चे दिग्दर्शन केले होते.

मॅचबॉक्स शॉट्सच्या बॅनरखाली सरिता पाटील, संजय राउत्रे, दिक्षा ज्योत राउत्रे आणि विशाल बजाज यांची निर्मिती असलेला हा चित्रपट 11 नोव्हेंबर, 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT