shilpa shetty instagram Saam Tv
मनोरंजन बातम्या

'आईला मला व्हॉलीबॉल खेळाडू बनवायचं होतं, पण...'; शिल्पा शेट्टीचा मोठा खुलासा

शिल्पा शेट्टी सध्या तिच्या नवीन चित्रपट 'निक्कमा'च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे.हा चित्रपट १७ जूनला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये बोलताना शिल्पा शेट्टीने तिच्या आयुष्याशी जोडलेला एक मोठा खुलासा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री (actress) शिल्पा शेट्टी सध्या तिच्या नवीन चित्रपट (Movie) 'निक्कमा'(nikamma)च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी शिल्पा शेट्टी (shilpa shetty) अनेक रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली आहे. तसेच शिल्पा शेट्टी तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरूनही प्रोमोशन करत आहे. हा चित्रपट १७ जूनला संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये बोलताना शिल्पा शेट्टीने तिच्या आयुष्याशी जोडलेला एक मोठा खुलासा केला आहे.

शिल्पा शेट्टीने एका वृत्तपात्राशी संवाद साधताना सांगितले की,' लहानपणी माझे पालक मला कामचुकार समजायचे. ही गोष्ट त्यावेळेची आहे, जेव्हा शिल्पा शेट्टी शाळेत शिकत होती. शिल्पा शेट्टी पुढे म्हणाली की, दहावीच्या अंतिम परीक्षेआधी सराव परीक्षेत मला फक्त ४८ टक्के मिळाले होते. त्यावेळेस माझ्यासाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट होती'.

आईला खूश करण्यासाठी शिल्पाने केली खूप मेहनत...

शिल्पा शेट्टीने पुढे सांगितले की, 'माझ्या आईला मला व्हॉलीबॉल खेळाडू बनवायचं होतं. परंतु मी त्या खेळात अजिबात चांगली नव्हती. त्यामुळे आईला खूप वाईट वाटायचं. तिला खूश करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली.परंतु यामुळे माझं माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि मला परिक्षेत कमी टक्के मिळाले. ज्यामुळे आईला आणखी वाईट वाटलं' पुढे शिल्पाने 'निकम्मा'या चित्रपटात काम केल्यामुळे आनंद व्यक्त करत म्हणाली की, 'मी 'निकम्मा' चित्रपटाचा भाग आहे, याचा मला खूप आनंद आहे. हा खूप चांगला व आनंददायी चित्रपट आहे'. 'निकम्मा' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करणार होती. परंतु नियतीमुळे 'हंगामा २' हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला. या सर्व गोष्टी देवाच्या इच्छेवर असतात. त्याला आपण बदलू शकत नाही', असेही शिल्पाने सांगितले.

१७ जूनला प्रदर्शित होणार 'निकम्मा' हा चित्रपट

'निकम्मा' या चित्रपटात शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त अभिमन्यु दासानी ,शर्ली सेतिया, सुनील ग्रोवर आणि समीर सोनी देखील महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. शर्ली सेतिया ही 'निकम्मा' या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २०१७ मध्ये आलेला तेलुगू सिनेमा 'मिडिल क्लास अब्बाई' चा हिंदी रीमेक आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT